सासवड शहर, ता. १७ : ‘‘पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात विजय शिवतारे यांचा विजय निश्चित झाला आहे. दीड वर्षात गुंजवणीचे पाणी तालुक्यात आणणार, हा शिवतारे यांचा शब्द आहे. फुरसुंगी, देवाची उरुळी पुण्याच्या जवळ दोन गावांचा कचरा डेपोमुळे पाण्याच्या प्रश्नाचे दुर्भिक्ष निर्माण झाले होते. या गावांसाठी ११७ कोटींची पाणी योजना करून पूर्ण देखील केली. याशिवाय अनेक नवीन सोसायटी यानंतरच्या काळात निर्माण झाल्या. त्यांच्यासाठी नव्याने वाढीव शंभर कोटी रुपये प्रस्तावित केले आहेत,’’ असे भाजपचे तालुकाध्यक्ष नीलेश जगताप यांनी सांगितले.
जगताप पुढे म्हणाले, ‘‘सासवड आणि जेजुरी येथे रोजच्या रोज पाणी मिळत नाही. कधी तीन दिवसांनी, तर कधी चार दिवसांनी पाणी येते. म्हणून सासवड शहरासाठी १४३ कोटी रुपयांची, तर जेजुरी शहरासाठी वीर धरणातून ७८ कोटी रुपयांची योजना मिळवली आहे. पुरंदर उपसा-जानाईचे पाणी फक्त १९ टक्के रकमेत शेतकऱ्यांना दिले. पण सत्ता बदल झाल्यानंतर रक्कम तिप्पट करण्यात आली. महायुती आघाडीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी ही रक्कम पुन्हा १९ टक्के केली. फुरसुंगी- उरुळी देवाची येथील नागरिक भयंकर कर आकारामुळे त्रस्त होते. महानगरपालिका या गावांना पिण्याचे पाणी, रस्ते, गटारे आरोग्य, आणि शिक्षण या भागात शेकडो कोटीचा महसूल जमा करत होती. शिवाय टॅक्सचा बडगा त्यांच्यासमोर होता. शिवतारे यांनी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या गावांची स्वतंत्र नगरपरिषद निर्माण केली. मागच्या पाच वर्षात फुरसुंगी, उरुळी, आंबेगाव, उंड्री, पिसोळी, शेवाळवाडी, सासवड, जेजुरी येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या नगरविकास विभागाकडून १०० कोटी रुपये मिळविले. त्यापैकी बहुतांश काम पूर्ण झाली आहेत.’’
यावेळी उमेदवार विजय शिवतारे, जिल्हाप्रमुख दिलीप यादव, माजी पंचायत समिती सभापती अतुल म्हस्के, उपजिल्हाप्रमुख उमेश गायकवाड, ममता शिवतारे-लांडे, डॉ. रमेश इंगळे आदी उपस्थित होते.
धालेवाडी (ता. पुरंदर) : कोपरा सभेत बोलताना नीलेश जगताप व इतर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.