पुणे

जपानी मेंदूज्‍वराविरुद्ध सुरक्षाकवच

CD

पुणे, ता. २५ : जपानी मेंदूज्वर (जॅपनीज एन्सेफेलायटीस-जेई) सारख्या गंभीर आजारापासून बचाव व्‍हावा यासाठी शहरात १ ते १५ वयोगटातील मुला-मुलींना महापालिकेकडून ‘जेई’ची लस देण्‍यात येत आहे. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने एक मार्चपासून मुला-मुलींसाठी लसीकरण मोहीम सुरू केली असून, या मोहिमेंतर्गत साडेतीन महिन्‍यांत दोन लाख ९२ हजार ५०१ मुला-मुलींना लस दिली आहे. परीक्षा, सुट्ट्यांमुळे लसीकरणात अडथळा आल्‍याने लसीकरण मोहीम गेल्‍या महिन्‍यात मंदावली होती.
‘जेई’ हा विषाणूजन्य मेंदूज्वर आहे. तो क्‍यूलेक्‍स डासांच्‍या चाव्यापासून दुसऱ्याला पसरतो. डासांमध्‍ये तो डुकरांपासून पसरतो. पुढे हा दूषित डास माणसाला चावल्‍यावर त्‍याची लागण होते. हा आजार मेंदूवर परिणाम करून गंभीर मेंदूविषयक समस्या निर्माण करतो. उपचाराला उशीर झाल्‍यास मृत्यूही होऊ शकतो. याच्‍या प्रतिबंधासाठी ‘जेई’ लसीकरण आवश्यक आहे. शहरातील सुमारे १० लाख ४३ हजार ४२० मुलांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ही लसीकरण सत्रे प्राथमिक व माध्यमिक शाळा, अंगणवाडी केंद्रे आणि समुदाय केंद्रांमध्ये आयोजित केली जात आहेत. महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत ५२२ लस टोचणारे कर्मचारी, ३६५ आशा कार्यकर्त्या एक हजार ९२ अंगणवाडी सेविका आणि ८४८ शिक्षक शिक्षिकांचा सहभाग आहे.

लसीकरणातही मुलींचीच बाजी
कोणत्‍याही मोहिमेत किंवा लसीकरणात मुलांची संख्‍या जास्‍त असते. मात्र या मोहिमेत मुलांच्‍या तुलनेत मुलींची संख्‍या जास्‍त आहे. शहरात आतापर्यंत १ ते १५ वयोगटातील एकूण दोन लाख ९२ हजार मुला-मुलींचे लसीकरण झालेले आहे. त्‍यापैकी एक लाख ४१ हजार मुलांना तर एक लाख ५० हजार मुलींना हा डोस दिला आहे. यातून या मोहिमेत मुलांच्‍या तुलनेत मुलींनीच बाजी मारल्‍याचे दिसून येत आहे.

लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी पालकांनी मुलांना या लसीकरणात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे. शाळा सुरू झाल्‍यावरही मोहीम सुरू राहील. अधिक माहितीसाठी आपल्या जवळील शाळा, अंगणवाडी केंद्र किंवा पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधावा.
- डॉ. राजेश दिघे, सहाय्यक आरोग्‍य अधिकारी, पुणे महापालिका

आकडे बोलतात
- लसीकरण उद्दिष्ट ः १० लाख ४३ हजार
- राज्‍याकडून मिळालेल्या लस ः ६ लाख ७९ हजार
- आतापर्यंत झालेले लसीकरण ः २ लाख ९२ हजार
- शिल्‍लक लस ः ३ लाख ८७ हजार
- राज्‍याकडून मिळालेल्‍या सुया ः ८ लाख
- वापरलेल्‍या सुया ः २ लाख ९७ हजार
- शिल्‍लक सुया ः ५ लाख २ हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाणी वाचवा! एक लीटर पाण्यात अंघोळ, RSSच्या स्वयंसेवकांना प्रशिक्षण देत असल्याचा VIDEO VIRAL

IPL 2026 Final, RCB vs GT live: अहमदाबादमध्ये रंगणार महामुकाबला! दुसऱ्या ट्रॉफीसाठी बंगळुरू-गुजरात आमने-सामने; कुठे अन् कधी पाहाणार मॅच?

Solapur Vidhansabha BJP: सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपचा सस्पेन्स कायम; उमेदवारीवरून भाजपमध्ये चुरस, कोणाला मिळणार संधी?

Pune Medical College: दोन तासांचे काम; महिन्याचा दाम, पुण्यातील अटलबिहारी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्‍टरांचा अनोखा फंडा

"आमिर आणि माझ्या नात्याला नाव मिळालं नाही" पूजा भट्टचा धक्कादायक खुलासा; नात्याबद्दल म्हणाली..

SCROLL FOR NEXT