पुणे

ज्योतिर्लिंगांचा सर्वसमावेशक विकास आराखडा असावा

CD

मुंबई, ता. १० : ‘‘राज्यातील ज्योतिर्लिंगांना वर्षभर भाविक भेट देण्याची संख्या अधिक आहे. हे लक्षात घेऊन पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील घृष्णेश्‍वर ज्योतिर्लिंगांचा सर्वसमावेशक विकास आराखडा असावा. मंदिर परिसरातील सुरू असलेली कामे गतीने करून प्रस्तावित कामांचे योग्य नियोजन करावे. या परिसरात भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी अत्याधुनिक एकात्मिक सुरक्षाप्रणाली कार्यरत करून भाविकांसाठी उत्कृष्ट दर्जाच्या सेवा, सुविधा तयार करण्यासाठी गतीने कार्यवाही करावी.’’ असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुंबईतील वर्षा निवासस्थानी ज्योतिर्लिंग विकास सादरीकरणाबाबत बैठक आयोजित केली होती. त्यात ज्योतिर्लिंगांच्या विकास आराखड्याची प्रभावी आणि तत्काळ अंमलबजावणी करण्यासाठी नियुक्त असलेले अधिकारी यांनी यावेळी विकास आराखड्यांचे सादरीकरण केले. भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखडा, भीमाशंकर विकास आराखडा कुंभमेळा २०२७ चे सादरीकरण सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी केले.
फडणवीस म्हणाले, ‘‘राज्यातील ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी येणारी सध्याची आणि भविष्यातील भाविकांची संख्या लक्षात घेता दर्शन रांगांचे नियोजन, यात्रा उत्सव कालावधी हे लक्षात घेऊन मंदिर परिसरात प्रतीक्षा कक्ष, पिण्याच्या पाण्याची सोय, निवासाची व्यवस्था, अंतर्गत रस्ते, परिसर साफसफाई करणे, माहिती फलक, पर्यटक स्वागत कक्ष, पार्किंग व्यवस्थापन, आपत्कालीन यंत्रणा, तिकीट कक्ष, आरोग्य सुविधा, उपहारगृह यासह पर्यटन वाढीला चालना देणारे उपक्रम या भागात प्रामुख्याने राबवा. स्थानिक नागरिक व प्रशासनाला विचारात घेऊन येथील कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा.’’

खबरदारीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करा
ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था काटेकोर असावी यासाठी खबरदारी घ्यावी. अत्याधुनिक यंत्रणा, तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने एकात्मिक सुरक्षा प्रणाली विकसित करा, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तत्काळ मदत मिळेल. पर्यावरण संवर्धन व रोजगार निर्मितीसाठी पर्यटन विभागानेही येथील प्रस्तावित कामे गतीने करावीत. आज सादर झालेल्या आराखड्यांना उच्चस्तरीय समितीकडून मंजुरीनंतर निधी मिळेल. पुरातत्त्व विभागाकडून घेण्यात येणाऱ्या मंजुरीसाठी केंद्र शासनाच्या अधिकाऱ्यांसोबत एक वेगळी बैठक आयोजित करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War: इराण-इस्रायलच्या लढाईत भारताला फटका! चार दिवसांत मोठं आर्थिक नुकसान, धक्कादायक आकडेवारी समोर

IND vs ENG: चंद्रग्रहणात सराव... नको रे बाबा! भारतीय संघाने वानखेडेवरील सरावाची वेळ बदलली, सूर्याच्या संघाने 'ती' वेळ टाळली

Drunk and Drive Crime : ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ विरोधात मोहीम! तीन दिवसांत ३०१ मद्यपी चालकांवर कारवाई

Latest Marathi News Live Update: एका महिन्यात चार बिबटे जेरबंद

Baba Venga Prediction : इराण–इस्रायल–अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर बाबा वेंगा यांची भविष्यवाणी चर्चेत

SCROLL FOR NEXT