

Kolhapur kasaba bavda Accident News
esakal
Kolhapur road accident kasaba bavda : मेरी वेदर मैदानाजवळ रस्ता ओलांडणाऱ्या दांपत्याच्या मोपेडला कसबा बावड्याकडून भरधाव वेगात आलेल्या स्पोर्टस् बाईकने धडक दिली. या अपघातात जखमी माजी नगरसेवक राजाराम गायकवाड यांचा मुलगा गौतम राजाराम गायकवाड (वय ४०, रा. रमणमळा) यांचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी अल्पवयीन चालकाला मोटारसायकल देणाऱ्या मामासह पालकांवरही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शाहूपुरी पोलिस ठाण्यात सुरू होती. अपघातानंतर उपचार मिळण्यात विलंब झाल्याने जखमीला जीव गमवावा लागला.