पुणे

मालकी हक्क प्रमाणपत्र अन् कचऱ्याचा प्रश्न कायम

CD

पिंपरी, ता. २४ : थेरगाव गावठाण - पवारनगर परिसरांत नागरिक गेल्या चार दशकांपासून वास्तव्यास असले, तरी आजही मूलभूत हक्कांसाठी झगडताना दिसत आहेत. मालकी हक्क प्रमाणपत्रे (प्रॉपर्टी कार्ड) अद्याप न मिळाल्याने एकीकडे आर्थिक व कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागत आहे, तर दुसरीकडे रिंगरोड प्रकल्पामुळे हजारो घरांवर गंडांतर येण्याची भीती नागरिकांच्या मनात घर करून बसली आहे. त्यामुळे ‘आज घर आहे, उद्या राहील की नाही?’ या चिंतेने नागरिकांची झोप उडाली आहे. या परिसरातील घरे प्राधिकरण बाधित क्षेत्रात असल्याचे कारण पुढे करून अद्यापही मालकी हक्क प्रमाणपत्रे देण्यात आलेली नाहीत. यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन आणि आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणावर अडचणीत आले आहेत. प्रभाग क्रमांक २३ मधील नागरी समस्या केवळ मालकी हक्क आणि रिंगरोडपुरत्याच मर्यादित नाहीत तर, येथील नागरिकांपुढे स्वच्छतेचे मोठे आव्हान आहे. परिसरातील

- नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी
बँकेतून गृहकर्ज किंवा व्यवसायासाठी कर्ज घेता येत नाही
घराची खरेदी-विक्री, नोंदणी, वारसाहक्क प्रक्रिया रखडते
घर दुरुस्ती किंवा पुनर्बांधणीसाठी अधिकृत परवानग्या मिळत नाहीत
भविष्यात घरावर हक्क राहील की नाही, याची कायम भीती कायम
कर, वीज-पाणी बिल नागरिक भरत असले, तरीही मालकी नाही

रिंगरोड प्रकल्पामुळे हजारो घरांवर संकट
या भागातून जाणारा रिंगरोड मूळ नियोजनानुसार सर्व्हे क्रमांक बारामधून जाणार होता. मात्र, काही धनदांडग्यांच्या हस्तक्षेपामुळे हा रिंगरोड सर्वे क्रमांक १४ मधून नेण्याचे नियोजन करण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार असून अंदाजे पाच ते सहा हजार घरे बाधित होण्याची शक्यता आहे.

रिंगरोडसंदर्भातील प्रमुख तक्रारी :
- मूळ आराखड्यात बदल करून नागरिकांच्या वस्तीतून रस्ता नेण्याचा प्रयत्न
- बाधित घरांसाठी पुनर्वसनाबाबत कोणतीही ठोस माहिती नाही
- नोटिसांच्या भितीने नागरिक मानसिक तणावाखाली
- अनेक कुटुंबांचे संपूर्ण आयुष्यभराचे घर उद्ध्वस्त होण्याची भीती
- विकासाच्या नावाखाली अस्तित्वच पुसले जात असल्याचा नागरिकांचा आरोप

कुठे? काय?
- पडवळनगर, अशोका सोसायटी, साईनाथनगर : परिसरांत सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचलेले दिसून येतात. नियमित कचरा उचल न झाल्याने दुर्गंधी पसरली आहे.

- थेरगाव गावठाण : सार्वजनिक स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत बिकट असून महिलांच्या स्वच्छतागृहांना अनेक ठिकाणी टाळे लावण्यात आले आहेत. सार्वजनिक स्वच्छतागृहांची देखभाल नसल्याने आरोग्याच्या समस्या वाढण्याची भीती परिसरातील नागरिक व्यक्त करतात.

- गावठाण परिसर : परिसरातील रस्ते अजूनही कच्चे असून पावसाळ्यात पादचारी आणि वाहनचालकांना कसरत करावी लागते.

- थेरगाव परिसर : भाजी मंडईचा अभाव असल्याने भाजी व फळ विक्रेते रस्त्यावर हातगाड्या लावत आहेत. परिणामी, अरुंद रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. याचा फटका स्थानिक व्यावसायिकांनाही बसत असून त्यांच्या दुकानांसमोर हातगाड्या लागल्याने ग्राहक येण्यावर परिणाम होत आहे.

समाविष्ट भाग :
थेरगाव गावठाण, प्रसूनधाम, गंगा आशियाना, कुणाल रेसिडन्सी, स्विस काउंटी, पडवळनगर, समर्थनगर, साईनाथनगर, अशोका सोसायटी.
...
चतु:सीमा -
पूर्वेस : चिखली-कस्पटे वस्ती रस्ता
पश्चिमेस : गंगा आशियाना रस्ता
उत्तरेस : पवना नदी
दक्षणेस : औंध रावेत बीआरटी रस्ता
.............
असे आहेत मतदार :
पुरूष : १७,६५७
महिला : १५,३७३
इतर : ३
एकुण मतदार :३३,०३३
-----------

PNE25V79505

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aravalli Case: अरावली वाचवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय! नवीन खाण परवान्यांवर बंदी; उद्योगाला मोठा झटका

Vijay Hazare Trophy : वैभव सूर्यवंशीच्या १९० धावा; रोहित शर्माच्या १५५ अन् विराट कोहलीच्या १३१ धावा! बघा ३ शतकांचा ५ मिनिटांचा Video

Dhaka bomb blast : भीषण बॉम्बस्फोटाने बांगलादेशचं ढाका हादरलं!; भर बाजारपेठेत अज्ञाताने फेकला 'क्रूड बॉम्ब'

UPSC Success Story : ग्रामीण शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी डॉ.भगवंत पवार यांचे UPSC CMS मध्ये ऑल इंडिया 25वी रँक!

Pune Digital Arrest : डेक्कनमध्ये ‘डिजिटल अरेस्ट’ फसवणूक; ७९ वर्षीय महिलेची १७ लाखांची आर्थिक हानी!

SCROLL FOR NEXT