टिळक चौक निगडी
--
वापरलेल्या प्लेट धुण्याऐवजी
पुसून वापरण्यावर भर
निगडीतील टिळक चौकालगत दिवंगत महापौर मधुकरराव पवळे उड्डाणपुलाखाली पीएमपीचा बस थांबा असून, अतिशय वर्दळीचे ठिकाण आहे. इथे येणाऱ्या अनेक प्रवाशांची पावले उड्डाणपुलाखालील खाऊ गल्लीकडे वळतात. विविध खाद्य पदार्थांचे २८ स्टॉल असून, बहुतांश विक्रेते ग्राहकांना प्लेटमध्ये छोटा कागद ठेऊन पदार्थ देत होते. पदार्थ खाऊन झाल्यानंतर प्लेट दुकानदाराकडे दिल्यानंतर प्लेट न धुता केवळ त्यावरील कागद बाजूला टाकत होते. तीच प्लेट कापडाने पुसून पुन्हा वापरली जात होती. काही दुकानदार एकाच बादलीत अनेक प्लेट धूत होते. ग्राहकांना पिण्याचे पाणी देण्यासाठी स्टॉलजवळ स्टीलची पिंप ठेऊन त्यामध्ये दुसऱ्या बाटलीतील अथवा कॅनमधील पाणी टाकले जात होते.
आढळलेले वास्तव
- चौपाटीशेजारी मेट्रोच्या कामासाठी खोदाई केल्याने पाऊस नसताना धूळ उडते
- मेट्रो पिलरसाठी खोदलेल्या खड्ड्यात पाणी साचले असून दलदल झाली आहे
- परिसरातही मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसून आली
- एकाच कापडाने टेबल पुसायचा, स्टॉलवरील कचरा साफ करायचा अन् त्याच कापडाने खाद्य पदार्थाच्या प्लेटही साफ करायच्या
होय/नाही
- चौपाटी परिसरात स्वच्छता होती का? : नाही
- आचारी किंवा विक्रेत्यांच्या हातात ग्लोव्हज किंवा डोक्यात कागदी टोपी होती का? : नाही
- जुनेच किंवा वापरलेले तेल पुन्हा वापरले होते का? : होय
- पाणी स्वच्छ किंवा जारचे होते का? : नाही
- ताट किंवा डिश धूत होते की पुसत होते? : पुसत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.