पुणे

खेडमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा

CD

राजगुरुनगर, ता. २२ : खेड तालुक्यातील उमेदवारांच्या अर्जांच्या छाननी दरम्यान नाणेकरवाडी- महाळुंगे गटात हाय व्होल्टेज ड्रामा पहावयास मिळाला. या गटातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार जीवन खराबी यांच्या उमेदवारी अर्जावर राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश बोत्रे यांच्यावतीने त्यांच्या सूचकाने हरकत घेतली. खराबवाडीतील गायरान जमिनीवर खराबी यांनी अतिक्रमण केले असून, त्या मालमत्तेची माहिती त्यांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रात दिली नाही, असा दावा हरकतीत केला. त्यावर सुनावणी झाली. संबंधित जमीन पूर्वी खराबी यांच्या वडिलांकडे होती आणि ती नंतर सरकारजमा करण्यात आलेली आहे. खराबी यांच्या नावावरच ती नसल्याने शपथपत्रात उल्लेख करण्याचा प्रश्नच नाही आणि त्या जमिनीवरच्या कथित अतिक्रमणाशीही त्यांचा संबंध नाही, असा खुलासा खराबी यांनी वकिलामार्फत केला. निवडणूक निर्णय अधिकारी अनिल दौंडे यांनी निकाल देण्यासाठी वेळ घेतला आणि त्यानंतर खराबी यांचा अर्ज वैध ठरल्याचा निर्णय दिला. या निकालानंतर वाडा रस्त्यावर फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला.
रेटवडी- वाफगाव गटातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार दीप्ती भोगाडे यांच्या अर्जावर अपक्ष उमेदवार रूपाली जाधव यांनी हरकत घेतली, पण हरकतीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्याने त्यांची हरकत रेकॉर्डवर घेण्यात आली नाही. त्यामुळे भोगाडे यांचा अर्जही वैध ठरला.
मेदनकरवाडी- काळूस गटातील अपक्ष उमेदवार सोनल टोपे यांचा उमेदवारी अर्ज अपुरा भरल्याने अवैध ठरला. तर कडूस- चास गटातील अपक्ष उमेदवार सुवर्णा जाधव यांनी जात पडताळणींसंबंधी आवश्यक कागदपत्रे सादर न केल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरला. नाणेकरवाडी- महाळुंगे गटातील बाळू नाणेकर यांनी कॉंग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता, पण तो अपुरा भरल्याने अवैध ठरला. नाणेकरवाडी गणातील अपक्ष उमेदवार जयश्री शिंदे यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले होते, पण त्यांचे नाव मतदार यादीत नसल्याने दोन्ही अर्ज अवैध ठरले. सतीश भाडळे यांनी मरकळ गणातून दाखल केलेला अर्ज अपुरा भरल्याने अवैध ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT