पुणे

आरोग्य सेवेचा १३ हजार जणांनी घेतला लाभ

CD

पुणे, ता. ३ : कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ परिसरात झालेल्या मानवंदना कार्यक्रम जिल्हा परिषद प्रशासनाच्या काटेकोर नियोजनामुळे परिसर स्वच्छ राहिला. प्रशासनाने स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा आणि इतर मूलभूत सुविधांबाबत कुठलीही गैरसोय होऊ दिली नाही, यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तसेच उपचारासह इतर आरोग्य सेवेचा लाभ १३ हजार ३५७ नागरिकांना झाल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली.
मानवंदना कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने सविस्तर ‘कृती आराखडा’ तयार केला होता. त्यानुसार अधिकारी आणि कर्मचारी २४ तास कार्यरत राहिले. विजयस्तंभ परिसरासह वाहनतळ, पोलिस निवासस्थान आणि मुख्य मार्गांवर स्वच्छता, पाणी व आरोग्य सेवा प्रभावीपणे राबविण्यात आल्या. कार्यक्रमाच्या पाच दिवसांच्या कालावधीत दोन हजार ८०० तात्पुरत्या शौचालयांची उभारणी करण्यात आली होती. यासाठी ७३ ठिकाणे निश्चित करण्यात आली होती. स्वच्छतेची जबाबदारी २६५ स्वच्छता कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली होती. हे कर्मचारी पाच पाळ्यांमध्ये काम करत होते. प्रत्येक कर्मचाऱ्याला साधारण ३०० ते ४०० मीटर परिसराची जबाबदारी देण्यात आली होती. एकूण ७७ ठिकाणी स्वच्छता कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. स्वच्छतेच्या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी २६० पर्यवेक्षक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. आरोग्य सुविधांच्या दृष्टीनेही व्यापक नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रमस्थळी २३ ओपीडी केंद्रे, ४३ रुग्णवाहिका, १८ खासगी रुग्णालये आरक्षित, तसेच २८६ रुग्णालयीन खाटा सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.

विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायांना जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. नियोजनाची प्रभावी अंमलबजावणी झाली आहे. अनुयायांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील होते आणि त्याप्रमाणे कार्यवाही केली.
- चंद्रकांत वाघमारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे

दृष्टिक्षेपात
हिरकणी कक्षात स्तनदा माता आणि बालकांचा वापर : ९०५
बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) : ११,९०८
आंतररुग्ण विभाग (आयपीडी) : १४५
संदर्भित केलेले रुग्ण : १९
आयसीयू : ११०
ओरएस वाटप : ४,२६०
एकूण : १३,३५७


कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद, आरोग्य यंत्रणा, ग्रामपंचायत, स्वच्छता विभाग, पाणीपुरवठा विभाग तसेच इतर सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम केले. नियोजनाप्रमाणे प्रत्येक सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यात आली. कार्यक्रम शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. नागरिकांचे सहकार्य आणि कर्मचाऱ्यांची तत्परता यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला.
- गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP–AIMIM Alliance: ‘बटेंगे तो कटेंगे’सारखे घोषवाक्य देणाऱ्या भाजपची AIMIM सोबत युती, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट!

शिक्षणाधिकाऱ्यांचाच अभ्यास कच्चा, आदेशाचा चुकीचा अर्थ काढला; राज्यात शिक्षकांना दिल्या कुत्रे मोजण्याच्या सूचना

T20 World Cup 2026 : न्यूझीलंडचा संघ जाहीर; रोहित शर्माचा मित्र कर्णधार, एकाच डावात १९ सिक्स मारणाराही फलंदाजही परतला

Asaduddin Owaisi:‘१५ मिनिटां’चा इतिहास आहे, १५ तारखेला पुन्हा इतिहास घडवा: खासदार असदुद्दीन ओवेसी; राजकारणात नवा अध्याय लिहा!

अंबरनाथमध्ये भाजप-काँग्रेसची युती, कमळाला हाताचा आधार; शिवसेना शिंदे गट विरोधी बाकावर

SCROLL FOR NEXT