पुणे

वाहनांची तपासणी अवघ्या सहा मिनिटांत

CD

अविनाश ढगे : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १९ : मोशी येथील दहा एकर जागेत पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) स्वयंचलित चाचणी केंद्र (ऑटोमॅटिक टेस्टिंग सेंटर) उभारण्यात आले आहे. एक मार्चपासून ते कार्यान्वित झाल्यानंतर जुन्या वाहनांच्या सर्व तपासण्या (पासिंग) स्वयंचलित यंत्रांद्वारे केवळ सहा मिनिटांत होणार आहेत. त्यामुळे वाहनांची अचूक तपासणी होण्यासह वेळेचीही बचत होणार आहे.
अपघात कमी करणे आणि त्यासाठी वाहनांचे अचूक तपासणी करण्याच्यादृष्टीने राज्यात स्वयंचलित चाचणी केंद्र उभारण्याची घोषणा शासनाने केली होती. परिवहन विभागाने २०२४ मध्ये पिंपरी चिंचवडसह राज्यातील ५२ प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील स्वयंचलित चाचणी केंद्रांना मंजुरी दिली. पिंपरी चिंचवड स्वयंचलित चाचणी केंद्राची जून २०२४ मध्ये निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर मोशी येथे ११ हजार चौरस फुटांचे चाचणी केंद्र उभारण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. हे काम वर्षभरात पूर्ण होणे अपेक्षित होते. पण, कंत्राटदार काम सोडून गेल्याने प्रकल्प रखडला. ऑक्टोबर २०२५ दरम्यान या केंद्राचे आणि इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. केंद्रात यंत्रणा बसविण्याचे (तांत्रिक), इमारतीतील प्लंबिंग, इलेक्ट्रिक कामे आणि बाहेरील आवश्यक काम पूर्ण झाले. पण, त्यानंतर फक्त रस्त्याअभावी हे चाचणी केंद्र तीन ते चार महिने बंद ठेवण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली. मात्र, आता केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय आणि परिवहन विभागाच्या निर्देशांनंतर पिंपरी चिंचवड आरटीओने स्वयंचलित केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

एक मार्चपासून नवीन संकेतस्थळावर नोंदणी
सध्या वाहन योग्यता प्रमाणपत्र चाचणीसाठी परिवहन विभागाच्या ‘वाहन’ संकेतस्थळावर नोंदणी करता येत आहे. पण, एक मार्चपासून योग्यता प्रमाणपत्र चाचणीसाठी ‘https://vahan.parivahan.gov.in/AFMS/’ या संकेतस्थळावर नोंदणी करुनच वाहनांची स्वयंचलित चाचणी केंद्रावर योग्यता तपासणी बंधनकारक असणार आहे.  

या बाबींची होणार तपासणी
नवीन स्वयंचलित चाचणी केंद्र सुरू झाल्यानंतर वाहन योग्यता तपासणी क्षमता दररोज ३०० इतकी होणार आहे. प्रवासी आणि मालवाहतूक वाहन स्वयंचलित ट्रॅकवर गेल्यावर हेडलाईट अलायनर, स्पीडो मीटर टेस्टर, रोलर ब्रेक टेस्टर, कारसाठी सस्पेंशन टेस्टर, स्टेरिंग प्ले, गिअर, स्पीड गव्हर्नर, प्रवासी वाहनांचे ‘व्हीएलटीडी’ अशी त्याची विविध प्रकारची चाचणी होणार आहे. या सर्व तपासण्या स्वयंचलित यंत्रांद्वारे केवळ सहा मिनिटांत होणार आहेत. त्यानंतर वाहनांना स्वयंचलित यंत्रांच्या माध्यमातून योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफिकेट) दिले जाणार आहे.

पूर्वनोंदणी असल्यास ‘आरटीओ’तच चाचणी
परिवहन संवर्गातील वाहनांची पहिली आठ वर्षे योग्यता तपासणी प्रत्येकी दोन वर्षांनी करण्यात येते. वाहनाच्या आठ वर्षांनंतर ही तपासणी दरवर्षी करण्यात येते. ती केल्यानंतरच वाहन रस्त्यावर चालविण्यासाठी योग्यता प्रमाणपत्र दिले जाते. सध्या आरटीओचे मोटार वाहन निरीक्षक ट्रॅकवर स्वतः वाहन चालवून ते योग्य आहे की नाही, याची तपासणी करतात. त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले जाते. आता एक मार्चपर्यंत ज्या वाहन चालकांनी वाहन योग्यता प्रमाणपत्र चाचणीसाठी पूर्वनोंदणी केली आहे, त्या वाहनांची आरटीओ कार्यालयाच्या मागील बाजूस योग्यता चाचणी होणार आहे. मात्र, त्यानंतर नोंदणी होणाऱ्या वाहनांची योग्यता चाचणी मोशीत होणार आहे.


जुन्या पद्धतीने वाहनांची योग्यता प्रमाणपत्र चाचणीची नोंदणी एक मार्चपासून बंद होणार आहे. त्यामुळे आम्ही तात्पुरता रस्ता तयार करुन एक मार्चपासून स्वयंचलित चाचणी केंद्र सुरू करण्याचे प्रयत्न करत आहोत.
- राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड

असे आहे स्वयंचलित चाचणी केंद्र
- ११ हजार चौरस फुटांचे चाचणी केंद्र
- २ हजार चौरस फूट क्षेत्रांवर प्रशस्त कार्यालय
- ३३ मीटरचे एकूण चार टेस्टिंग ट्रॅक
- मालवाहतूक, प्रवासी वाहनांसाठी प्रत्येकी दोन ट्रॅक
- चार इन्स्पेक्शन पीट, दररोज ३०० वाहनांची तपासणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune fire news: क्षणात संसार राख झाला! हडपसरमध्ये मध्यरात्री आग, १९ झोपड्या खाक, कामगार कुटुंबांचे मोठे नुकसान

आजचे राशिभविष्य - 21 फेब्रुवारी 2026

अग्रलेख : राजघराण्याच्या वलयाला ग्रहण

Hoili 2026 : होळीसाठी मथुरा-वृंदावनला जाताय? मग तारखा नीट तपासा! यंदा 'या' दिवशी खेळली जाणार रंगपंचमी; ४० दिवस चालणार उत्सव

Panchang 21 February 2026: आजच्या दिवशी गणेश कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT