पुणे

अतिवृष्टीनंतरही पाणीटंचाईचे सावट गडद

CD

पुणे, ता. १६ : जिल्ह्यात यंदा पावसाळ्यात काही भागांत अतिवृष्टी होऊनही उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईची तीव्रता जाणवू लागली आहे. गतवर्षीच्या तुलनेत सुमारे १५ दिवस अगोदरच ग्रामीण भागात पाण्याचे टँकर सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. आंबेगाव तालुक्यातील कारेगाव, थुगाव आणि पारगाव तर्फे खेड या तीन गावांसाठी सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून, आणखी नऊ गावांचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत.
पुणे जिल्ह्यात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. मे महिन्यातच सुरू झालेला पाऊस शेतकऱ्यांना पेरण्या करण्यास उसंत देत नव्हता. नंतर काही ठिकाणी अतिवृष्टी ही झाली. मात्र हिवाळ्यानंतर जलस्रोतांवरील वाढलेला ताण यामुळे मार्च महिन्यापासूनच अनेक गावांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली. परिणामी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याच्या हालचाली अपेक्षेपेक्षा लवकर कराव्या लागल्या. गतवर्षी १ एप्रिलला पहिला पाण्याचा टँकर सुरू झाला होता. यावर्षी जवळपास १५ दिवस अगोदरच टँकर सुरू करण्याची वेळ आली.
आंबेगावमध्ये टँकरद्वारे सुमारे ६ हजार ८२५ नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. याबाबत आंबेगावच्या गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज म्हणाल्या, ‘‘तीन टँकर सुरू असून, नऊ ग्रामपंचायतींकडूनही टँकर सुरू करण्याबाबतचे प्रस्ताव आले आहेत. या प्रस्तावांची शहानिशा करण्याचे काम सुरू असून आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित गावांमध्येही टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहेत.’’


दृष्टिक्षेपात
जिल्ह्यातील ७७६ गावांसाठी टंचाई निवारण आराखडा
२३८ गावे आणि सुमारे १२०० वाड्यांसाठी टँकरने पाणीपुरवठा करण्याचा आराखडा
१,१९९ विंधन विहिरी दुरुस्ती, २७५ नवीन विंधन विहिरी आणि ४३ स्रोत बळकटीकरणाची कामे प्रस्तावित
कायमस्वरूपी योजना शक्य नसलेल्या गावांसाठी खासगी विहिरी अधिग्रहित करणे
तीन हजार ३३० कामांचा प्रस्ताव सादर
सुमारे ३५ कोटी ६४ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित


कोट
पेठ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना प्रगतीपथावर असून कारेगाव, थुगाव आणि पारगाव तर्फे खेड ही गावे या योजनेच्या कार्यक्षेत्रात येतात. टंचाई भासणाऱ्या गावांसाठी विविध उपाययोजना प्रस्तावित आहेत.
- अमित पाथरवट, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा, जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel War: होर्मुजच्या समुद्रधुनीत भारत इराणविरुद्ध युद्धनौका तैनात करणार? ट्रम्प यांच्या आवाहनावर परराष्ट्र मंत्रालयाने दिलं उत्तर

Pune News: सुरक्षारक्षकाच्‍या सतर्कतेमुळे युवती सुखरूप परतली घरी; युवती रात्रभर अंधारात, अन् खडकवासला धरण परिसरात काय घडलं!

Pune Pollution: प्रदूषण रोखण्याची घोषणा हवेतच! पुणे महापालिकेला बांधकाम प्रकल्पांवर सेन्सर बसविण्याचा विसर, धूलिकणांचा आरोग्यावर गंभीर परिणाम..

Javali politics: जावळीच्या राजकारणात शिवेंद्रसिंहराजेच'धुरंधर'; दोन्ही पदांवर भाजपचाच झेंडा, राष्ट्रवादीच्या शिल्पा शिंदे तटस्थ!

Latest Marathi Update: DRDO चे माजी शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर जासूसी प्रकरण

SCROLL FOR NEXT