पुणे

झेडपीच्या रस्त्यांवर पावसाळ्यापूर्वी डांबर

CD

पुणे, ता. २३ : ‘‘जिल्हा परिषद अंतर्गतच्या ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्गांवरील कामांचा दर्जा चांगला राखण्यात यावा, त्याचबरोबर सर्व कामे पावसाळ्यापूर्वी म्हणजेच २५ मेअगोदर पूर्ण करण्याच्या सूचना बांधकाम विभागामधील दक्षिण आणि उत्तर दोन्ही विभागाच्या अभियंत्यांना दिल्या आहेत,’’ अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी सोमवारी (ता. २३) पत्रकार परिषदेत दिली. तसेच, शिक्षण विभागात रिक्त असलेल्या पदांवर तातडीने अधिकारी मिळण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील उपस्थित होते. अखर्चिक निधीच्याबद्दल बोलताना जगदाळे म्हणाले, ‘‘यावर्षीचा अर्थसंकल्प हा ३०१ कोटी रुपयांचा आहे, पण तेवढा निधी खर्च झाला पाहिजे. आम्ही जास्तीत जास्त निधी खर्च करण्यावर भर देणार आहोत. शिवाय जे विभाग नेहमी दुर्लक्षित राहतात, त्यांच्याकडून निधी अधिक प्रमाणात खर्च होत नाही, अशा विभागांवर अधिक भर दिला जाईल. येत्या काही दिवसांमध्ये सुधारित अर्थसंकल्प मांडण्यात येईल. त्यामध्ये सदस्यांच्या विकासकामांचा आणि सूचनांचा अंतर्भाव करण्यासाठी सभापतींच्या निवडी झाल्यानंतर एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुधारित अर्थसंकल्प मांडला जाईल.’’

इस्रो, नासा योजनेत वाढ
जगदाळे म्हणाले, ‘‘जिल्हा परिषदेचे यावर्षी पंचवीस विद्यार्थी नासाला जाऊन आले. त्याचबरोबर इतरही योजनांची राज्य पातळीवर दखल घेण्यात आली. पुढील आर्थिक वर्षापासून जिल्हा परिषदेचे अधिकाधिक विद्यार्थी इस्रो, नासाला पाठविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी पुरेशा निधीची तरतूद करण्यात येईल. इस्रो, नासा ही ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाची योजना ठरत आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हा परिषदेच्या विभागांचे नेहमी आढावा घेत होते. त्यांनी शिक्षण आणि आरोग्यावर अधिक भर दिला. त्यांच्या संकल्पनेतून सध्या जिल्ह्यात मॉडेल स्कूल आणि मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राची कामे सुरू आहेत. त्यामध्ये आता आणखी वाढ करून जास्त पटांच्या शाळांची निवड करून मॉडेल स्कूलच्या धर्तीवर विकसित करण्याचा आमचा मानस आहे. त्याचबरोबर येत्या काळात जिल्ह्यातील ४० प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ३०० शाळांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यात येईल.
- वीरधवल जगदाळे, अध्यक्ष, जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''शेण कुणी खाल्लं हे संजय राऊतांना विचारा'', सुषमा अंधारेंच्या 'त्या' टीकेला काँग्रेसचं उत्तर...

Alephata News : शेतकरी पुत्राची कृषी अधिकारीपदी झेप; आळे येथील आदित्य तितरचे यश

Bhor Crime : भोरमध्ये दरमहा चार तरुणींचे पलायन; पोलिसांसमोर आव्हान, पाच वर्षांत आठ महिला बेपत्ता

IPL 2026 तोंडावर असताना जसप्रीत बुमराह बंगळुरूतील CoE मध्ये दाखल ! मुंबई इंडियन्सला धक्का बसणार?

माहेरी गेलेल्या पत्नीला एकटं गाठून पतीने केला जीवघेणा हल्ला, घरात रक्ताचा सडा; फरार पतीचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT