‘‘बॅंक ऑफ बडोदामध्ये महापालिकेच्या ठेवी होत्या. त्या काढून बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये ठेवल्या. त्याबाबत मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन म्हणाले, ‘‘महापालिकेच्या आर्थिक व्यवहारासाठी १९८८ पासून बँक ऑफ बडोदामध्ये विविध निधींची बँक खाती आहेत. २०१७ पासून त्यांवर प्रवेश नोंद-निर्गमन नोंद सुविधा उपलब्ध होती. २६ जुलै २०२१ रोजी कर व करेत्तर उत्पन्नाच्या दैनंदिन भरण्याच्या सेवा व सुविधांसाठी बँक ऑफ बडोदाबरोबरच्या तीन वर्षांच्या करारनाम्याची मुदत २६ जुलै २०२४ रोजी संपली. त्यामुळे व्यवहारासाठी शासनाच्या १३ मार्च २०२० च्या निर्णयानुसार राष्ट्रीयकृत बँकेच्या नेमणुकीसाठी आयुक्तांच्या चार जुलै २०२४ च्या प्रस्तावानुसार स्वारस्य अभिव्यक्ती (एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट) मागविले. यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ इंडिया यांच्याकडून प्रस्ताव आले. ती पाकिटे एक जुलै २०२४ रोजी उघडली. प्रस्तावानुसार तुलना करून आयुक्तांच्या सहा जून २०२४ च्या प्रस्तावान्वये महापालिकेकडील सर्व खाती बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये उघडण्यासाठी तीन वर्षांच्या करारास मान्यता मिळाली आहे. स्थायी समितीच्या १३ ऑगस्ट २०२४ व महापालिका सभा ठराव २७ ऑगस्ट २०२४ अन्वये मान्यता मिळाली आहे. यास्तव बँक ऑफ महाराष्ट्रमधील सेवा सुविधांसाठी महापालिका व बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये २५ सप्टेंबर २०२४ रोजी करार केलेला आहे. त्यानुसार बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये खाती उघडली आहेत.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.