पिंपरी, ता. २७ : प्रशासकीय काळात नागरिकांचे प्रश्न जलद गतीने सुटावेत, जनतेसोबत सुसंवाद राखावा, यासाठी चार वर्षे क्षेत्रीय कार्यालयनिहाय जनसंवाद सभांचे आयोजन केले जात होते. त्यात नागरिकांचा थेट सहभाग असल्याने त्यांचे काही प्रश्न सुटले. आता महापालिकेची सूत्रे लोकप्रतिनिधींच्या हाती आहेत. मात्र, प्रभाग समित्या (क्षेत्रीय कार्यालय) अजूनही स्थापन झालेल्या नाहीत. गेल्या दीड महिन्यात जनसंवाद सभाही झालेल्या नाहीत. त्यामुळे या सभा बंद होऊन क्षेत्रीय कार्यालय समिती स्तरावरच अवलंबून राहावे लागणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
अशी होती जनसंवादची रचना
- तत्कालीन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी नागरिकांच्या सोयीसाठी प्रत्येक सोमवारी क्षेत्रीय कार्यालयस्तरांवर जनसंवाद सभा सुरू केल्या
- त्यानंतर तत्कालीन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी प्रत्येक सोमवारऐवजी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या सोमवारी जनसंवाद सभा सुरू ठेवल्या
- तत्कालीन प्रभारी आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांनीही महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या सोमवारी जनसंवाद सभा सुरू ठेवल्या
जनसंवाद सभांचे फायदे
- क्षेत्रीय कार्यालयस्तरीय जनसंवाद सभांमध्ये संबंधित कार्यालय क्षेत्रातील नागरिकांचा थेट सहभाग
- जनसंवाद सभा अध्यक्षपदी नियुक्त अधिकारी, संबंधित क्षेत्रीय अधिकारी व नागरिक समोरासमोर
- नागरिकांच्या थेट सहभागामुळे नागरी प्रश्न, समस्या, अडचणी अधिकाऱ्यांसमोर मांडता आल्या
- वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहभागामुळे अनेक प्रश्न सभेतच मार्गी लागल्याची काही उदाहरणे
अन्य सभांमध्ये नागरिक सहभाग नाही
- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केवळ नगरसेवक, नगरसेविका व स्वीकृत सदस्यांचा सहभाग
- स्थायी व अन्य विषय समिती सभांमध्ये केवळ त्या त्या समिती सदस्यांचा सहभाग
- क्षेत्रीय कार्यालय सभांमध्ये संबंधित कार्यालय क्षेत्रातील नगरसेवक व स्वीकृत सदस्यांचा सहभाग
क्षेत्रीय कार्यालय संख्या वाढणार
महापालिकेचे ३२ प्रभाग आहेत. त्यांची विभागणी आठ क्षेत्रीय कार्यालयांत केली आहे. एका क्षेत्रीय कार्यालयांतर्गत चार प्रभागांचा समावेश आहे. क्षेत्रीय कार्यालय समित्यांची पंधरा दिवसांतून सभा होतात. आता क्षेत्रीय कार्यालयांची संख्या दहा करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेने मंजूर केला आहे. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयांची पुनर्रचना करताना कोणत्या कार्यालय कक्षेत कोणते प्रभाग समाविष्ट केले जातील, हे सर्वस्वी सत्ताधारी भाजपच्या हाती आहे.
प्रभाग किंवा जनसंवाद सभा घ्याव्यात
क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रात प्रभागांचा समावेश असतो. त्यांच्या स्तरावर होणाऱ्या समित्यांमध्ये संबंधित प्रभागांतील सदस्यांचा समावेश असतो. मात्र, नागरिकांचे अधिकाधिक प्रश्न सोडविण्यासाठी आणि त्यांचा थेट निर्णय प्रक्रियेत सहभाग होण्यासाठी प्रभागस्तरांवर अर्थात वॉर्डनिहाय सभा होणे आवश्यक आहे. त्यांचे स्वरूप ‘जनसंवाद’सारखे ठेवायला हवे. त्यामुळे नागरिकांना थेट प्रश्न मांडण्याची संधी मिळेल. त्यासाठी सत्ताधारी भाजपसह राष्ट्रवादी व शिवसेनेने निर्णय द्यायला हवा.
क्षेत्रीय कार्यालयस्तरीय समित्या स्थापन झाल्यानंतर त्यांच्या सभा सुरू होतील. त्यानंतर प्रभागस्तरावर जनसंवाद सभा घेण्याचे नियोजन आहे.
- भाऊसाहेब भोईर, विरोधी पक्षनेते, महापालिका
क्षेत्रीय कार्यालयस्तरीय समित्या स्थापन झाल्यानंतर त्यांच्या सभा सुरू होतील. त्यानंतर प्रभागस्तरावर जनसंवाद सभा घेण्याचे नियोजन आहे.
- महापौर,
क्षेत्रीय कार्यालयस्तरीय समित्या स्थापन झाल्यानंतर त्यांच्या सभा सुरू होतील. त्यानंतर प्रभागस्तरावर जनसंवाद सभा घेण्याचे नियोजन आहे.
- विरोधी पक्षनेते,
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.