पुणे

मांजरीत मोरगावकरांचा स्नेहमेळावा

CD

पुणे, ता. ३० ः श्री मयुरेश्‍वर मोरगावकर सांस्कृतिक मंडळाचे १०वे वार्षिक स्नेहसंमेलन मांजरी येथे नुकतेच पार पडले. या स्नेहसंमेलनात पुणे व पिंपरी चिंचवडमधील मोरगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमास व्याख्याते डॉ. दत्ता कोहिनकर यांनी ‘सकारात्मक विचार, व्यक्तिमत्त्व विकास व यशासाठी आवश्‍यक मानसिक ताकद’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या रोहिणी कदम (ढोले) व इएसआयसी आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रवीण गायकवाड यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी बाळासाहेब तावरे, माजी पोलिस महासंचालक सुरेश खोपडे, महापालिकेचे उपायुक्त संदिप कदम उपस्थित होते.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यात असणाऱ्या व शासकीय, निमशासकीय, खासगी, आयटी, शैक्षणिक, राजकीय व क्रीडा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मोरगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावेळी कौटुंबिक परिचय, दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थी, स्पर्धा परिक्षेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन संतोष तावरे, अविनाश ढोले, महादेव ढोले, दीपक ढोले व विजय कदम यांनी केले आणि विजय कदम यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: ३४ धावांवर ४ विकेट्स, CSK संकटात...संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड क्लिनबोल्ड, चौथ्याच ओव्हरला इमॅक्ट प्लेअरचा समावेश

Mumbai News : एल्फिन्स्टन पुलासाठी २६ तासांचे सहा मेगाब्लॉक; पहिला ब्लॉक काही तासांत, पाच पॅनल टप्प्याटप्प्याने काढणार

Pune Crime : देवदर्शनावेळी ओळख, फिरायला नेत ठेवले संबंध; ब्लॅकमेल करत २ लाखांची मागणी, तोतया महिला वकिलाला अटक

विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार सेवा, ‘आदर्श शाळा’ योजनेत राज्यात ४०५ शाळा विकसित करण्यास मंजुरी

Share Market Closed: 31 मार्चला शेअर बाजार बंद? ट्रेडिंग होणार की नाही? गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT