पुणे

तुकडेबंदी कायद्यातील बदलांची माहिती पोचेना अपर तहसील कार्यालयात चार महिन्यांत २७४ दस्तांची नोंदणी तुकडेबंदी कायद्यातील बदलांची माहिती पोचेना

CD

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ४ ः राज्य शासनाने तुकडाबंदी कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आणि अंमलबजावणीची कार्यपद्धती निश्‍चित केल्यानंतर चार महिन्यांत पिंपरी चिंचवड अपर तहसील कार्यालयात केवळ २७४ तुकडेबंदी दस्तांची नोंदणी ७/१२ उताऱ्यावर करण्यात आली. त्यामुळे वर्षानुवर्षे मालकी हक्कापासून वचिंत असलेल्यांना मालकी हक्क मिळाला आहे.
नागरी भागातील आणि महापालिका, नगरपालिका, पीएमआरडीए क्षेत्रातील तुकडेबंदी कायदा (१९४७) रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने तीन नोव्हेंबर रोजी घेतला. १५ नोव्हेंबर १९६५ ते १५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत शासनाने वेळोवेळी अधिसूचित केलेल्या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची खरेदी झालेल्या व्यवहारांची दस्तनोंदणी झाली नाही. आता ही दस्तनोंदणी करताना सात टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागते. तुकडेबंदीचा दस्त नोंदविताना खरेदीदार आणि विक्री करणाऱ्यांना प्रतिज्ञापत्र द्यावे लागते. यामध्ये प्रामुख्याने नोंदणीसाठी सादर होत असलेले क्षेत्र यापूर्वी कोणत्याही अन्य व्यक्तीस नोंदणीकृत किंवा अनोंदणीकृत दस्तऐवजाद्वारे हस्तांतरित केलेले नाही, तसेच दस्तनोंदणीसाठी सादर केलेली ७/१२ उतारा व अन्य कागदपत्रे सत्य आहेत, असे प्रतिज्ञापत्रात नमूद करावे लागते.
-----
अशी होते कार्यवाही
दस्तनोंदणी कार्यालयात खरेदी खत झाल्यानंतर नोंदणीचा तपशील ऑनलाइन संबंधित तलाठी कार्यालयाला जातो. त्यानंतर तलाठी कार्यालयाकडून नागरिकांना नोटीस बजावली जाते. त्यानंतर नागरिकांनी तलाठी कार्यालयात कागदपत्रे सादर केल्यानंतर ७/१२ उताऱ्यावरील इतर हक्कातील तुकडेबंदी शेरे, दस्तांची नोंदणी करण्यात येत आहे.
--------
असा मिळतोय लाभ
महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायत यांच्यासोबतच राज्यातील विकास प्राधिकरणे व नियोजन प्राधिकरणे, प्रादेशिक आराखडा (आरपी) लागू असेल अशा हद्दीत निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक किंवा इतर कोणत्याही अकृषिक वापरासाठी असलेल्या झोनमध्ये नव्या निर्णयानुसार जमिनीची एक-दोन गुंठ्यांची खरेदी विक्री करणे शक्य झाले आहे गावांच्या हद्दीपासून २०० मीटरच्या आतील क्षेत्र तुकडेबंदी कायद्यातून वगळण्यात आले आहे.
-------------
तुकडेबंदी शेरे, दस्तांची नोंदणींसाठी आवश्‍यक कागदपत्रे
- खरेदी खत प्रत, चालू ७/१२ व संबंधित ७/१२ उतारे व फेरफार आणि अर्ज आदी कागदपत्रे तलाठी कार्यालयात जमा करावी लागणार आहेत.
---------
महसूल गावे - १२३ ते १२८
एकूण तलाठी - ३१
कालावधी - नोव्हेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६
तुकडेबंदी दस्तांची नोंद - २७४
-----------
‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’अंतर्गत तुकडेबंदी दस्तांची नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जास्तीत-जास्त नागरिकांनी या शिबीरात सहभागी होऊन नोंदणी करावी.
- जयराज देशमुख, तहसीलदार, हवेली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 GT vs RR : १२ चेंडूंत ४ विकेट्स! रवी बिश्नोई, तुषार देशपांडेने गुजरातचा विजयाचा घास पळवला; राजस्थान Point Table मध्ये टॉपर

Strait of Hormuz: ''होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम, नाहीतर भीषण परिणाम...'' थेट इशारा

Solapur Awareness Ride: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी जन्मभूमी ते कर्मभूमी सायकल यात्रा; जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

विहीर रस्त्याच्या मधोमध, कठडा मोठा असता तर दुर्घटना टळली असती; CM फडणवीसांनी दुर्घटनेवर व्यक्त केलं दु:ख

विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! आता मुलींना दरमहा ५०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार, पण कोणाला? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT