पुणे

''श्री रोकडेश्वर''ने पटकविला शिवशंभो केसरी किताब

CD

पिरंगुट, ता. १८ : घोटावडे (ता.मुळशी) येथील बैलगाडा शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवून समर्थ अजित भेगडे यांच्या ''श्री रोकडेश्वर प्रसन्न'' या गाड्याने शिवशंभो केसरी किताबाचा मान पटकाविला. तर द्वितीय क्रमांक वडकी येथील भाई शेवाळे यांच्या माई या गाड्याने मिळविला. शिवशंभो प्रतिष्ठानने या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत प्रेक्षकांनी शर्यतीचा थरार अनुभवला.
चाले येथील वजीर यांच्या जाखुबाई प्रसन्न या गाड्याला तृतीय क्रमांक मिळाला. खडकवासला येथील शंभू बाजी ग्रूपच्या मुकाईमाता प्रसन्न या गाड्याला चौथा तर खडकवासला येथील भरत भारत यांच्या गाड्याला पाचवा क्रमांक मिळाला. विजयी बैलगाड्यांना अनुक्रमे एक लाख अकरा हजार एकशे अकरा, एक लाख एक हजार एकशे अकरा, एक्क्याण्ण हजार एकशे अकरा, एक्याऐंशी हजार एकशे अकरा व एकाहत्तर एकशे अकरा रुपये रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत सहभागी झालेल्या गाडा मालकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी राजाभाऊ हगवणे, सुनील चांदेरे, शांताराम इंगवले, बाबा कंधारे, गंगाराम मातेरे, भानुदास पानसरे, राजेंद्र बांदल, रविकांत धुमाळ, सुरेश हुलावळे, बाबाजी शेळके, पांडुरंग ओझरकर, सागर साखरे, शिवाजी बुचडे, राम गायकवाड, गणपत जगताप, योगेश शिंदे, विलास साखरे, संदीप साखरे, राम गवारे, नागेश साखरे, जनार्दन मातेरे आदी उपस्थित होते. शिवशंभो प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नीलेश गोडांबे, अभिजित वायकर, प्रदीप गोडांबे, श्‍यामराव गोडांबे, शेखर भेगडे, हनुमंत घोगरे, सोमनाथ खाणेकर, सचिन गोडांबे, सागर गोडांबे, केतन खानेकर तसेच अन्य पदाधिकारी यांनी नियोजन केले होते.


01797

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT