पिरंगुट, ता. २८ : लवळे (ता. मुळशी) येथील परप्रांतीय कामगाराने आत्महत्या केली. रबे आलम इलाही सिद्दीकी (वय २५, रा. लवळे लेबर कॅम्प; मूळ रा. उत्तर प्रदेश), असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव असून सोमवारी (ता. २७) रात्री अकरा वाजण्यापूर्वी ही घटना घडली आहे.
याबाबत पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत संजीवकुमार अमर चोबे (वय ३०, रा. म्हाळुंगे लेबर कॅम्प, ता. मुळशी; मूळ रा. बिहार) यांनी मंगळवारी दुपारी एक वाजता पौड पोलिसांत खबर दिली. लवळे येथील लेबरकॅम्प ई २मध्ये कामगारांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे. तेथील कामगार ग्यानेंद्रकुमार याने सोमवारी रात्री सुमारे सव्वाअकरा वाजता रूम नंबर ई २चा दरवाजा आतून बंद असल्याचे पाहिले. त्यामुळे त्याने खिडकीतून डोकावून पाहिले असता त्या खोलीत रबे आलम इलाही सिद्दीकी यास गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिला. त्यानंतर त्याने कंपनीचे व्यवस्थापक प्रवीण कोल्हे व राजशेखर स्वामी यांनी खोलीत प्रवेश करून पोलिसांच्या मदतीने मृतदेह पौड येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.