पुणे

लवळ्यातील शेतकऱ्याचा उपोषणाचा इशारा

CD

पिरंगुट, ता. ३१ : चुकीच्या मोजणीचा फटका बसलेल्या शेतकऱ्याने न्याय मिळण्यासाठी पौड येथील तहसील कार्यालयाबाहेर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे लवळे (ता. मुळशी) येथील शेतकरी अरुण राऊत यांनी भूमिअभिलेख, तहसील तसेच पौड पोलिस ठाणे आदी कार्यालयांना लेखी निवेदन दिले आहे.
निवेदनानुसार, राऊत यांच्या लवळे येथील शेत जमिनीची मोजणी काही वर्षांपूर्वी करण्यात आली होती. यावेळी भूमिअभिलेख कार्यालयाने शेतीच्या गटाच्या हद्दीवर शेतकऱ्याचे घर दाखवण्यात आलेले आहे. परंतु हे घर त्याठिकाणी नसून त्यापासून काही अंतरावर आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्या मोजणी वेळी मोजणी अधिकाऱ्यांनी हद्दीच्या चुकीच्या खुणा दाखविल्यामुळे दोन वेळा उपोषण आंदोलन करावे लागले. त्यानंतर भोर कार्यालयाने निमताना मोजणी केली. मात्र अद्याप त्याचा कोणताही अहवाल आलेला नाही. त्यामुळे न्यायासाठी पौड येथील तहसील कार्यालयासमोर सोमवारी (ता. ९ जून) आमरण उपोषणाला बसणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.
याबाबत पौड येथील भूमि अभिलेख विभागाच्या उपअधीक्षक स्वप्ना पाटील म्हणाल्या, ‘‘या प्रकरणी राऊत यांची कार्यालयातील कर्मचाऱ्याबाबत तक्रार आहे. त्यामुळे राऊत यांना पुन्हा तक्रारीस वाव राहू नये म्हणून वरिष्ठ कार्यालयाच्या मार्गदर्शनानुसार हे प्रकरण उपअधीक्षक भूमी अभिलेख भोर यांच्या कार्यालयाकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यांच्याकडून नियमानुसार कार्यवाही सुरु आहे. ही बाब न्यायप्रविष्ट असल्याने या प्रकरणाच्या गुणवत्तेवर भाष्य करणे योग्य होणार नाही. संबंधित कार्यालयाकडून नियमानुसार कार्यवाही अंती निर्णय होणार आहे. त्यामुळे राऊत यांनी आततायीपणे कोणताही निर्णय न घेता कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाणी वाचवा! एक लीटर पाण्यात अंघोळ, RSSच्या स्वयंसेवकांना प्रशिक्षण देत असल्याचा VIDEO VIRAL

IPL 2026 Final, RCB vs GT live: अहमदाबादमध्ये रंगणार महामुकाबला! दुसऱ्या ट्रॉफीसाठी बंगळुरू-गुजरात आमने-सामने; कुठे अन् कधी पाहाणार मॅच?

Solapur Vidhansabha BJP: सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपचा सस्पेन्स कायम; उमेदवारीवरून भाजपमध्ये चुरस, कोणाला मिळणार संधी?

Pune Medical College: दोन तासांचे काम; महिन्याचा दाम, पुण्यातील अटलबिहारी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्‍टरांचा अनोखा फंडा

"आमिर आणि माझ्या नात्याला नाव मिळालं नाही" पूजा भट्टचा धक्कादायक खुलासा; नात्याबद्दल म्हणाली..

SCROLL FOR NEXT