पुणे

मुळशीकरांची आळंदीत कीर्तन, महाप्रसादाची सेवा

CD

पिरंगुट, ता. ४ : आळंदी येथील मुळशी तालुका वारकरी संप्रदाय धर्मशाळेत सलग पस्तीस वर्षे कीर्तन आणि महाप्रसादाची सेवा मुळशीकरांकडून केली जात आहे. एकादशीला कीर्तन आणि द्वादशीला महाप्रसादाचे आयोजन केले जाते. मुळशी तालुक्यातील विविध गावची कुटुंबे नोकरी आणि व्यवसायानिमित्त पुणे शहरात स्थायिक झाली असून ते आता पुणेकर झाले आहेत. पुण्यात राहूनही वारकरी संप्रदायाचा वारसा त्यांनी जपून ठेवला आहे. त्यामुळे आळंदी आणि पंढरी म्हटलं की मुळशीकरांमधील भक्तिभाव, दानशूरता आणि सामाजिक बांधिलकी जागी होते. त्यातूनच शहरी संस्कृतीत राहूनही वारकरी संप्रदायाची जोपासना करण्यासाठी सगळे मुळशीकर एकवटतात.
मुळचे मुळशीकर परंतु पुणेरी झालेल्या वारकऱ्यांना एकत्रित करून वैकुंठवासी गणपत महादू सातपुते आणि वैकुंठवासी मुरलीधर माझिरे यांनी आळंदी येथे पुणेकरांच्या महाप्रसादाच्या पंगतीची प्रथा सुरू केली. हीच परंपरा आता राजेंद्र सातपुते, नरेंद्र सातपुते, विठ्ठल सातपुते, नामदेव माझिरे या त्यांच्या तिसऱ्या पिढीनेही सुरू ठेवली आहे. या उपक्रमाला उद्योजक राजेंद्र चाचरे आणि रावसाहेब हांडे, किरण मारणे, तुषार सातपुते, प्रदीप ऊदागे, अनिल गोरड यांचे सहकार्य आणि योगदान असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Rain update: 'सीना नदीचे रौद्ररूप; दहा गावांचा संपर्क तुटला'; वीस गावात पुराचे पाणी

IND vs WI : रिषभ पंत, करून नायर OUT, देवदत्त पडिक्कलला संधी! West Indies विरुद्ध असा असेल भारताचा कसोटी संघ

सर्वांसाठी सुरू झाला Amazon-Flipkart सेल; निम्म्यापेक्षा कमी किंमतीत मिळतायत वस्तु, 50 ते 80% डिस्काउंट ऑफर्स, पाहा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दहा दरवाजेही उघडले

Ladki Bahin Yojana eKYC Scam Alert : सावधान! लाडकी बहीण योजनेची eKYC करताय? रिकामं होईल बँक खातं, मोठा स्कॅम समोर

SCROLL FOR NEXT