पिरंगुट, ता. ३० : चांदणी चौक, सूस, म्हाळुंगे, भूगाव, भुकूम, तसेच घोटावडे फाटा आदी परिसरातील हॅाटेल परिसरात ३१ डिसेंबरनिमित्त १० अधिकारी आणि ६० अंमलदार यांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, असे बावधनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल विभुते यांनी सांगितले.
चांदणी चौकात पहिला तपासणी नाका असून, असून दुसरा चेक नाका ऐनवेळी आयोजित बसविण्यात येणार आहे. रात्री १२ पर्यंत वाद्य कामाला परवानगी आहे. याबाबत संबंधित आस्थापनांसोबत बैठक झाली असून त्यांना खबरदारीच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच, पौड पोलिसांनी लवासामध्ये जाणाऱ्या रस्त्यावर कांगुरमाळ ते मुख्य प्रवेशद्वार, रिहे खोऱ्यासाठी घोटावडे भागात तसेच पौड आदी तीन ठिकाणी तपासणी नाके बसविण्यात आले असून, गस्तीपथक चौवीस तास सज्ज ठेवलेले आहे.