पुणे

सामूदायिक विवाहासाठी नोंदणी करण्याचे आवाहन

CD

पिरंगुट, ता. २० : चंद्रकांत भरेकर मित्र परिवार व खारावडे (ता. मुळशी) येथील श्री म्हसोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने १२ एप्रिल रोजी मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. त्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.
या सामुदायिक विवाह सोहळ्यात वधू वरांना आयोजकांकडून संपूर्ण पोशाख व संसारोपयोगी भांड्यांचा संच भेट देण्यात येणार आहे. विवाहासाठी वधू- वरांकडून कोणत्याही प्रकारची वर्गणी घेतली जात नाही. सर्व जातीधर्माच्या मुलामुलींचे विवाह लावले जातात. आरोग्य चिकित्सा शिबिर व रक्तदान शिबिर हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य आहे. विवाह सोहळ्यास कालिचरण महाराज, सुदाम गोरखे गुरुजी हे वधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. सलग एकविसाव्या वर्षी पार पडणाऱ्या या मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचा संपूर्ण खर्च चंद्रकांत भरेकर मित्र परिवार करणार आहे. गावाने पुढाकार घेऊन एकाच मंडपात ५ लग्ने लावली तर त्याचा खर्च देण्याची तयारीही भरेकर मित्र परिवाराने ठेवली आहे, अशी या सामाजिक कार्याचे प्रणेते चंद्रकांत भरेकर यांनी दिली.
विवाह नोंदणीसाठी पुणे येथील संकल्प साकार, किनारा हॉटेल समोर, कोथरूड येथे सुभाष रोकडे यांच्याशी (मोबाईल क्रमांक- ९८२२७४३९१०) संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्र महिला आयोगाच्या पुढील अध्यक्षा कोण? दोन दमदार महिला नेत्यांची नावे समोर, नव्या चेहऱ्यांबाबत मोठी माहिती समोर

IPL 2026 Marathi News: महेंद्रसिंग धोनी पूर्णपणे तंदुरुस्त नाही? Video ने वाढवली चिंता; इरफान म्हणाला तसा, ही Dhoniची शेवटची IPL

Kolhapur : जिल्हा परिषद विषय समिती फॉर्म्युला ठरला; शिवसेनेला बांधकाम- आरोग्य, तर जनसुराज्यला शिक्षण-अर्थ

तुंबाडची मंजुळा सिनेमा दिग्गज कलाकारांची मांदियाळी ! अनोखी कल्पना वापरत उलगडली कास्ट

Corporation Water Crasis : कोल्हापुरात पाणीपुरवठ्यावरून वाद; महापालिका-जलसंपदा आमनेसामने, पदाधिकाऱ्यांची कडक भूमिका

SCROLL FOR NEXT