पुणे

खारावडे येथे सोहळ्यात २१ जोडपी विवाहबद्ध

CD

पिरंगुट, ता. १४ : चंद्रकांतअण्णा भरेकर मित्र परिवार व खारावडे (ता. मुळशी) येथील श्री म्हसोबा देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित केलेल्या बिगर हुंडा मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यात २१ जोडपी विवाहबद्ध झाली.
या बिगरहुंडा मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे यंदा २१वे वर्षे होते. सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत भरेकर आणि मित्र परिवाराच्या वतीने या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत सुमारे ७५०पेक्षा जास्त विवाह संपन्न झाले आहेत. सोहळ्याच्या वेळी वऱ्हाडी मंडळींची जेवणाची सोय केली गेली होती. सोहळ्याच्या आयोजकांकडून वधू-वरांना संपूर्ण पोशाख, संसारोपयोगी भांड्याचा संच देण्यात आला. त्यानिमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. तसेच, शिवव्याख्याते श्रीमंत कोकाटे यांचे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील व्याख्यान झाले. जिल्हा परिषद सदस्य शांताराम इंगवले म्हसोबा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा मधुरा भेलके यांनी वधू-वरांना शुभाशीर्वाद दिले. मदन व्हावळ यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे संयोजन गणेश भरेकर, किरण भरेकर, विठ्ठल भरेकर, सुभाष रोकडे, तात्या देवकर यांनी केले.

Latest Marathi News Live Update : चांदिवली विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी प्रक्रिया सुरू

Summer Mobile Cooling Tips : उन्हाळ्यात तुमचा फोनही 'भट्टी'सारखा तापतोय? मग 'ही' १ छोटी सेटिंग करा आणि फोन ठेवा बर्फासारखा कूल!

Vaibhav Sooryavanshi चे भारतीय संघात पदार्पण म्हणजे, संजू सॅमसन-सूर्यकुमार यादव यांच्यासाठी Bad News? रिपोर्टने उडवलीय झोप

Gold Investment: अक्षय तृतीयेला सोने घ्यायचंय? दागिने, डिजिटल, बार की ETF! खरा फायदा कुठे? चुकीचा पर्याय पडेल महागात

IPL 2026: रोहित शर्मा पंजाबविरुद्ध खेळणार नाही, पण मग मुंबई इंडियन्ससाठी ओपनिंग करणार कोण? या खेळाडूंचा पर्याय

SCROLL FOR NEXT