पिरंगुट, ता. २० : मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तालुका युवती अध्यक्षपदी पिरंगुट (ता. मुळशी) येथील ऋतुजा राहुल पवळे यांची निवड करण्यात आली. खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पवळे यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी पक्ष प्रवक्ते विकास लवांडे, माजी सभापती महादेव कोंढरे, उपसभापती दगडूकाका करंजावणे, पंचायत समिती सदस्य राहुल पवळे, महिला जिल्हाध्यक्षा भारती शेवाळे, युवती जिल्हाध्यक्षा ॲड. दुर्गा चोरघे, संतोष पवळे, कृष्णा नवाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. निवडीनंतर ऋतुजा पवळे म्हणाल्या, ‘‘पुढील काळात या मिळालेल्या संधीच्या माध्यमातून तालुक्यातील प्रलंबित असलेले प्रश्न विशेषतः महिला सबलीकरण, मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न, युवतींसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.’’
05465
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.