पुणे

मांढर येथे महिलांना नैसर्गिक, सेंद्रिय शेतीचे धडे

CD

परिंचे, ता.१८ : मांढर (ता.पुरंदर) येथे सुमारे ५० महिला शेतकऱ्यांना नैसर्गिक व सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देण्यात आले. महाराष्ट्र शासन कृषी विभाग व किल्ले पुरंदर भात उत्पादक गट यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्राचे नुकतेच आयोजन केले होते.

डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन या योजनेअंतर्गत गाव पातळीवर पन्नास हेक्टरचे सेंद्रिय शेती करणारे गट तयार करण्यात येत आहेत. त्या गटांची आत्मा अंतर्गत नोंदणी करण्यात येणार आहे. शेतकरी गटांची गाव पातळीवरील स्थापना झाल्यानंतर, पाचशे हेक्टर क्षेत्रामधील अंदाजे दहा गटातील शेतकऱ्यांची एकत्रित फार्मर प्रोड्यूसर कंपनीची स्थापना केंद्र सरकारच्या कंपनी कायद्यानुसार करण्यात येणार असल्याचे कृषी पर्यवेक्षक संदीप कदम यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना जैविक बीज प्रक्रिया, सेंद्रिय निविष्ठा तयार करण्यासाठी प्रोत्साहित करणार आहे. शेतीचे खर्च कमी करून, उत्पादन वाढवण्याचा शासनाचा हा उपक्रम असल्याचे कृषी सहाय्यक हर्षवर्धन इंगळे यांनी सांगितले.

दरम्यान, बचत गटांचे मार्गदर्शक तानाजी शिर्के, राजश्री पापळ यांची विविध कृषी विषयक उपक्रमांची माहिती दिली.

कार्यक्रमासाठी ग्रामविकास अधिकारी शशांक सावंत, मांढरच्या सरपंच वनिता पापळ, उपसरपंच किरण काशीद, पूनम गाडे, शेतकरी महिला बचत गटाच्या राजश्री शिर्के तसेच शेतकरी उपस्थित होते. ग्रामसेवक शशांक सावंत यांनी आभार मानले.

सेंद्रिय शेतीसाठी यावर दिला जाणार भर
१. पिकांमध्ये चिकटसापळे, पक्षी थांबे तयार करून नैसर्गिक कीड नियंत्रण करणार
२. शेतातील काडीकचरा, पालापाचोळा, तसेच शेणखत, गोमूत्र इत्यादींचा वापर
३. शेतकऱ्यांच्या शेताचे जीओ टॅगिंग करणार
४. सेंद्रिय प्रमाणिकरण पुढील टप्प्यात करण्यात येईल.

कृषी विषयक वस्तूचे बक्षीस वाटप
कार्यक्रमात महिला शेतकऱ्यांची कृषी विषयक ज्ञान जाणून घेण्यासाठी चाचणी घेण्यात आली. यामध्ये राणी पापळ, माधुरी शिर्के, रूपाली तांबेकर, शैला शिर्के, मनीषा सुकल या विजेत्या ठरल्या. त्यांना कृषी विषयक वस्तूचे बक्षीस म्हणून वाटप करण्यात आले.

02585

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मंत्रालयातच चोरी, मंत्र्याच्या कॅबिनमधून ८० हजार रुपये लंपास...

IPL 2026: हार्दिक पांड्या CSK कडून खेळणार? '०७:०७' पोस्ट अन् Mumbai Indians चा कॅप्टनची चर्चा... नेमकी भानगड काय?

Thane Crime: ‘प्रेम’ बनलं सापळा! १४० हून अधिक तरुणींची फसवणूक; ‘लव्ह स्कॅम’चा मास्टरमाइंड अटकेत

माझ्या नवऱ्यानेदेखील त्या बातम्या वाचल्या... मित्रांसोबत अफेअरच्या चर्चांवर पूजा सावंतने सोडलं मौन; म्हणाली-

Latest Marathi News Live Update : बाजारात इलेक्ट्रिक दुचाकीं खरेदीकडे नागरिकांचा कल

SCROLL FOR NEXT