परिंचे, ता.३० : श्री क्षेत्र वीर (ता.पुरंदर) येथे गुडी पाडव्यानिमित्त मानकरी व पाटील यांच्या उपस्थितीत अढी वाचनात करण्यात आले. यंदा पिकांची परिस्थिती समाधानकारक असल्याचे सांगण्यात आले. नववर्षाच्या मुहूर्तावर श्री नाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांच्या उत्सव मूर्तींना अलंकारिक पोशाख परिधान करण्यात आले होते. गावच्या चावडीवर सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत देवस्थान ट्रस्टच्या कामाचा वार्षिक अहवाल मांडून नव्याने करण्यात येणाऱ्या विकास कामांची माहिती देण्यात आली ग्राम पुरोहित यांनी पंचाग वाचन केले.
देवाचे अलंकारिक रूप पहाण्यासाठी महिला भाविकांनी देऊळवाड्यात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. गुढीपाडव्यानिमित्त पहाटे पाच वाजता महापूजा करून मंदिर बंद करण्यात आले सकाळी सहा वाजता मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. नववर्षानिमित्त भाविकांचे अभिषेक करण्यात आले. गावकरी व भाविकांच्या उपस्थितीत सकाळी सात वाजता मंदिरात गुडी उभारण्यात आली. सकाळी साडेआठ वाजता देवाचे मानकरी शिंगाडे, तरडे, बुरंगुले ,ढवाण, व्हटकर तसेच गावचे मुकादम पाटील चंद्रकांत धुमाळ यांच्या हस्ते आढीचे पूजन करून आढी काढण्यात आली ज्या धान्याला जास्त मोड आलेले असतात ते पीक जोमात येणार असल्याचे सांगितले जाते.
बारा महिन्यांच्या बारा आढ्या
अढी वाचनात कार्यक्रमात चांगली, मध्यम तसेच कोरडवाहू पिकांचा अहवाल सांगितला जातो. मराठी महिन्यांनुसार खरीप व रब्बी हंगामातील घेतल्या जाणाऱ्या पिकांच्या बारा महिन्यांच्या बारा व चार दिशांना चार आढ्या लावल्या जातात यावर्षी बाजरी, भुईमूग, हरभरा, गहू तसेच कडधान्य व मिरची, कोथिंबीर ही पिके समाधानकारक असल्याचे सांगितले यावेळी ग्राम पुरोहित थिटे बंधूंनी मंत्रोच्चार अढी वाचन करण्यात आले यावेळी देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
02597
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.