परिंचे, ता. ४ : पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या हद्दीत असलेल्या वीर (ता. पुरंदर) धरणात सद्यस्थतीला ५३.८४ टक्के (५.०६ टीएमसी) पाणी साठा असून, रब्बी हंगामाला जोडून उन्हाळी आवर्तन सुरू ठेवण्यात आले आहे. त्याचा लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
वीर धरणात ५३.८४ टक्के पाणीसाठा असलेल्या दोन्ही कालव्यातून मुबलक प्रमाणात सिंचनासाठी पाणी पुरवठा केला जात आहे. नीरा डाव्या कालव्यातून ८२७ कयूसेकने, तर नीरा उजव्या कालव्यातून १,५५० क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. जून महिन्यापर्यंत कालव्यातून आवर्तन सुरू राहणार असल्याचे उपअभियंता अनंत पासलकर यांनी सांगितले. यावेळी शाखा अभियंता स्वरूपा माळी, लक्ष्मणराव सुद्रीक, सहाय्यक अभियंता व्यंकटेश मुंडे, दिशा डोंगरे आदी अधिकारी उपस्थित होते.
यंदा परतीचा पाऊस उशिरापर्यंत सुरू राहिल्याने रब्बी हंगामातील आवर्तन उशिरा सोडण्यात आले होते. जून महिन्यापर्यंत दोन्ही कालव्यातून नियमित विसर्ग सोडण्यात येणार असल्याने धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या गावांना या पाण्याचा फायदा होणार आहे. वीर धरणात चालू वर्षी पाणीसाठा समाधानकारक असल्यामुळे सासवड व लोणंद शहरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत सुरू राहण्यास मदत होणार आहे.
१० टक्के अधिक पाणीसाठा
नीरा खोऱ्यातील नीरा- देवघर, भाटघर, वीर, गुंजवणी या चार धरणांत शुक्रवारी (ता. ४) गतवर्षापेक्षा सरासरी १० टक्क्यांनी पाणीसाठा अधिक आहे. भाटघर धरणात ४१.६३ टक्के, नीरा देवघर धरणात ३१.३२ टक्के, गुंजवणी धरणात ४६.८८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. चार धरणात एकूण २०.२५ टीएमसी (४१.९१ टक्के) पाणीसाठा उपलब्ध असून, मागील वर्षी आजच्या दिवशी १५.७० टीएमसी (३२.५० टक्के) पाणीसाठा उपलब्ध होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.