पुणे

शेतकऱ्यांकडून माहूर जलाशयाचे पूजन

CD

परिंचे, ता.२९ : दरवर्षी जुलै महिन्याच्या सुरुवातीला भरणारा माहूर (ता. पुरंदर) प्रकल्प यंदा उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असतानाच पूर्ण क्षमतेने भरला. माहूरजाई पाणी वापर संस्थेच्या वतीने लाभार्थी शेतकऱ्यांनी गावचे इनामदार हेमंतकुमार माहूरकर यांच्या हस्ते जलपूजन करून आनंदोत्सव साजरा केला.
पुरंदर किल्ल्यावरून वाहत येणाऱ्या केदार गंगा नदीवर १९७२ मध्ये माहूर जलाशयाची निर्मिती केली असून चालू पर्जन्यमान वर्षात दोन वेळा पूर्ण क्षमतेने भरण्यचा मान माहूर जलाशयाने पटकावला आहे. गेल्यावर्षी पाऊस काळ कमी असताना देखील माहूर जलाशय पूर्ण क्षमतेने भरला होता. जलाशय व परिसराचे नैसर्गिक सौंदर्य पहाण्यासारखे असून सांडव्यातून वाहणारा पाण्याचा धबधबा पर्यटकांचे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल जलाशयात नौकाविहार, वॉटर पार्क, जलतरण तलाव आधी गोष्टी साकारणे सहज शक्य असल्याचे मत हेमंतकुमार माहूरकर यांनी व्यक्त करून या परिसराचा पर्यटन विकास होण्यासाठी शासनाने मदत करण्याची मागणी केली आहे.
एक हजार एकर शेत शिवाराला बारमाही पाण्याची हमी देणारा हा प्रकल्प असून या परिसराचा पर्यटन विकास झाल्यास परिसरातील अनेक व्यवसायाला चालना मिळणार असून रोजगाराची नवीन संधी उपलब्ध होणार असल्याचे शरद जगताप यांनी सांगितले.
दरम्यान, जलाशयातील पाण्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटला असल्याचे माजी उपसरपंच हनुमंत माहूरकर यांनी सांगितले.
जलपूजनप्रसंगी नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद जगताप, उपसरपंच मेघा जगताप, पोलिस पाटील आरती जगताप, राम जगताप, सत्यवान गोळे , हनुमंत माहूरकर, शंकर पवार, शिवाजी जगताप, नामदेव ताकवले, संजय फडतरे, प्रा.रवींद्र जगताप, महादेव जगताप, बाळासाहेब जगताप, अमोल गोळे व लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.

02645

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyan Bharatam Yojana: आता भारताचा भाषिक वारसा संरक्षित होणार! नव्या योजनेची घोषणा, 'ज्ञान भारतम' योजना म्हणजे नेमकी काय?

Video: हेच खरंखुरं स्वातंत्र्य! पुणे महागनर पालिकेच्या सुरक्षेची कमान तृतीयपंथीयांच्या हाती

Latest Marathi News Live Updates : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

श्री कृष्ण जन्माष्टमीनिमित्त प्रियजनांना पाठवा मराठीतून खास शुभेच्छा,पाहा एकापेक्षा एक सुंदर मॅसेज

Independence Day: ...म्हणून देश एकसंध राहिला, नाहीतर...; इतिहास सांगत काँग्रेस नेते मोदींना नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT