पुणे

मुळशी तालुक्यात शिक्षकांना शिक्षण धोरणासाठी प्रशिक्षण

CD

पौड, ता. १९ : ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण २.०’ हे प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना दिले जात आहे. मुळशी तालुक्यातील शिक्षकांना चार टप्प्यांत हे प्रशिक्षण दिले जाणार असून, बावधन येथील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये पहिला टप्पा सुरू आहे. पाच दिवसांच्या या प्रशिक्षणात शिक्षक विद्यार्थ्यांच्या भूमिकेत असून ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची उद्दिष्टे, वैशिष्ट्ये, बदल अभ्यासत आहेत.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे जिल्हा परिषद आणि मुळशी पंचायत समितीच्यावतीने या प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील सुमारे एक हजार शिक्षकांना चार टप्प्यात हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात २२८ शिक्षक सहभागी झाले आहेत. बावधनच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये या प्रशिक्षणाचे उद्‍घाटन गटशिक्षणाधिकारी सुजाता देशमाने, विस्तार अधिकारी अशोक गोडसे यांच्या हस्ते झाले
या प्रशिक्षणाचे समन्वयक म्हणून मुठा केंद्रप्रमुख सोपान ठकोरे, भूगाव केंद्रप्रमुख चंद्रकांत म्हाळसकर, विषयतज्ञ संतोष गायकवाड व मीनाक्षी खाडे हे काम पाहत आहेत. तर प्रियतमा फापाळे, सुवर्णा सातपुते, बापूसाहेब पवार, सुनीता पवार, प्राची दंडवते, पल्लवी चौधरी, विनोद खंडागळे, अक्षता उत्तेकर, सविता थोरात, मनीषा लेकुरवाळे, रत्नदीप रामटेके, संजय बोरसे, महेश सलगंटे, राम करपे, शुभांगी मोरे, रेवणनाथ आढाव हे सोळा तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षण धोरण आराखडा समजावून सांगतात. पाच कुलांमध्ये प्रत्येकी ५० शिक्षकांना हे प्रशिक्षण दिले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात बेसिक पे 69000 रुपये, वार्षिक वाढ 6 टक्के; 51 पानांचं निवेदन

Radhanagari Bee Attack: रक्षाविसर्जनाला कावळ्याची वाट पाहणं पडलं महागात! कावळ्यासोबत मधमाशा आल्या अन्; १०० जखमी तर १२ गंभीर, लोकांना पळता भुई थोडी, व्हिडिओ व्हायरल

Ruturaj Gaikwad: 'काळजी नको, लवकरच मी...', ऋतुराज खराब फॉर्मवर स्पष्ट बोलला; CSK च्या खराब फिल्डिंगबद्दल काय म्हणाला?

Latest Marathi News Live Update: नेस्को सेंटर मध्ये ड्रग्स पार्टी प्रकरणात लायझनिंग करणारा इंद्रजीत सिंग याला तात्काळ अटक करा; मनसेची मागणी

चौधरी बिहारचे नवे 'सम्राट', मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ; दोन उपमुख्यमंत्र्यांचाही शपथविधी, नितीशकुमार उपस्थित

SCROLL FOR NEXT