पुणे

पौडला गुरुवारी रंगणार श्रीमल्लिकार्जुन कुस्तीचा थरार

CD

पौड, ता. २५ : महाशिवरात्री उत्सवानिमित्त पौड (ता. मुळशी) येथे दरवर्षीप्रमाणे श्रीमल्लिकार्जुन कुस्ती दंगल २०२५ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कुस्तीशौकिनांना विविध नामवंतांच्या कुस्त्यांचा थरार पाहायला मिळणार आहे. गुरुवारी (ता. २७) श्रीमल्लिकार्जुन महादेव मंदिर, पौड येथे या स्पर्धा होणार असल्याची माहिती कुस्ती दंगलचे संस्थापक अमित पिंगळे यांनी दिली.

महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख विरुद्ध पंजाब केसरी उमेश मथुरा यांच्यात या पहिल्या क्रमांकासाठी कुस्ती होणार आहे. या कुस्तीसाठी कै. धनंजय तुकाराम दाभाडे यांच्या स्मरणार्थ मधुर दाभाडे व अमित पिंगळे यांच्याकडून पाच लाख रुपये व चांदीची गदा दिली जाणार आहे. तसेच पृश्वीराज पाक्षल विरुद्ध प्रकाश बनकर, रविराज चव्हाण विरुद्ध कालिचरण सोलनकर, समीर शेख विरुद्ध राहुल सूळ, अनिकेत मांगडे विरुद्ध शुभम कोळेकर, चैतन्य पिंगळे विरुद्ध ओम भरणे या चित्तथरारक कुस्त्या पाहायला मिळणार आहेत. सोनाली मंडलिक विरुद्ध प्रतीक्षा बागडी ही महिलांची कुस्तीही लक्षवेधी ठरणार आहे. तसेच इतर ७५ कुस्त्यांमधून कुस्ती शौकिनांना विविध डाव प्रतिडाव याची रंगत पाहायला मिळणार आहे.

यावेळी आमदार शंकर मांडेकर, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ, मुळशी तालुका कुस्तीगीर संघ तालीमचे अध्यक्ष गोविंद आंग्रे, श्रीपाद खटावकर (आरोग्य), वैभव सोनवणे (शौर्य), तुषार खरात (आदर्श सरपंच), उमेश गावडे (उद्योगरत्न), विक्रम क्षीरसागर (खेलरत्न), रवी कुंभार (समाज्जोनती) यांचाही विशेष सन्मान करण्यात येणार असल्याचे अमित पिंगळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Prices : इराण-अमेरिका युद्धाचा थेट फटका! गॅस सिलिंडर महाग; आजपासून नवे दर लागू, किती झाली किंमत?

अग्रलेख : उजेडातील रोषणाई!

मोठी बातमी! पहिली ते नववीची अंतिम सत्र परीक्षा २० एप्रिलपासून; शिक्षक-विद्यार्थ्यांना ४४ दिवसांची उन्हाळा सुट्टी; १५ जूनपासून सुरु होणार शाळा

Weekend Special Recipe: नवीन काहीतरी खायचंय? मग वीकेंडला बनवा चविष्ट मुगदाळीची बाटी, सोपी आहे रेसिपी

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ७ मार्च २०२६ ते १३ मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT