पुणे

मुळशीतील ३३ शाळा शंभर नंबरी

CD

पौड, ता. १३ : इयत्ता दहावीचा मुळशी तालुक्याचा एकूण निकाल ९७.३६ टक्के लागला आहे. तालुक्यातील ३३ शाळांचे निकाल शंभर टक्के लागले आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मुलांपेक्षा मुलींनीच टक्केवारीत आघाडी घेतली आहे.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पौड येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, कोळवणचे न्यू इंग्लिश स्कूल, शेरे येथील मामासाहेब मोहोळ विद्यालय, घोटावडे येथील न्यू इंग्लिश स्कूल आणि मुठा येथील मामासाहेब मोहोळ विद्यालय या पाच शाळा शंभर नंबरी ठरल्या आहेत. पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूलच्या बावधन, पिरंगुट आणि सूस या तिन्ही शाखांतील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुळशी धरण विभाग शिक्षण मंडळाच्या माले येथील सेनापती बापट विद्यालय, खेचरे येथील अप्पासाहेब ढमाले विद्यालय या दोन्ही शाखांचे निकाल शंभर टक्के लागले आहेत. पिरंगुटच्या विद्या भवन इंग्लिश मीडियम स्कूलनेही शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. विद्या विकास मंदिर आंदगाव, नामदेवराव मोहोळ विद्यालय खांबोली, चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालय बावधन, महात्मा फुले विद्यालय लवळे, माध्यमिक विद्यालय काशिग, तुकाई माध्यमिक विद्यालय नेरे, माध्यमिक विद्यालय भूगाव, स्वामी विवेकानंद विद्यालय असदे, श्री विंझाईदेवी हायस्कूल ताम्हिणी, राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा कासारअंबोली, न्यू इंग्लिश स्कूल माण, माध्यमिक विद्यालय कोळावडे, शार्दूल एस. जाधवर विद्यालय बावधन, धनीराज माध्यमिक विद्यालय बावधन, रामचंद्र शितोळे इंग्लिश मीडियम स्कूल मारूंजी, द जिनीयस इंग्लिश मीडियम स्कूल, द न्यू डेल इंग्लिश मीडियम स्कूल, दासवे पब्लिक स्कूल, मामासाहेब मोहोळ मेमोरिअल स्कूल, सुदर्शन विद्या मंदिर पिरंगुट, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदे, माऊंट डेल स्कूल या शाळांचे निकाल शंभर टक्के लागले आहेत.

तालुक्यातील इतर शाळांचे निकाल पुढीलप्रमाणे - पिरंगुट इंग्लिश स्कल पिरंगुट (९९.६८), भैरवनाथ विद्यालय रिहे (९८.४८), न्यू इंग्लिश स्कूल हिंजवडी (९६.८२), मुळशी धरण प्रशाला पोमगाव (९१.६६), माध्यमिक विद्यालय म्हाळुंगे (९४.७३), नरसिंह विद्यालय ताथवडे (८८.००), कै.बाबूराव रायरीकर विद्यालय उरवडे (९८.२७), पीसीएमसीज माध्यमिक विद्यालय थेरगाव (८९.९१), माध्यमिक विद्यालय कुळे (९३.७५), न्यू इंग्लिश स्कूल मारूंजी (९७.८७), पीसीएमसीज माध्यमिक विद्यालय वाकड (८५.८६), संपर्क ग्रामीण विद्या विकास मंदिर भांबर्डे (९२.६८), कै. सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालय आंबवणे (९४.२८), न्यू इंग्लिश स्कूल सूसगाव (९३.३३), श्रीमती अनुसया ओव्हाळ माध्यमिक विद्यालय पुनावळे (८९.९०), अमृतेश्वर विद्यालय कोंढूर (९१.६६), सेंट्रल माध्यमिक निवासी शाळा पुणे (८०), अलार्ड हायस्कूल (९४.०२).

मुळशी तालुक्याचा निकाल
एकूण माध्यमिक शाळा- ५६
निकालाची टक्केवारी- ९७.३६
परीक्षेस बसलेली मुले- १७२२
परीक्षेस बसलेल्या मुली-१६५८
परीक्षेस बसलेले एकूण विद्यार्थी- ३३८०
उत्तीर्ण मुले- १६६५
उत्तीर्ण मुली- १६२६
एकूण उत्तीर्ण विद्यार्थी- ३२९१
उत्तीर्ण मुलांची टक्केवारी- ९६.६८
उत्तीर्ण मुलींचे टक्केवारी- ९८.०७
विशेष श्रेणीतील विद्यार्थी- ९९३
प्रथम श्रेणीतील विद्यार्थी- १३४१
द्वितीय श्रेणीतील विद्यार्थी- ८००
तृतीय श्रेणीतील विद्यार्थी- १५७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kapil Dev on stray dog protection: भटक्या कुत्र्यांच्या संरक्षणासाठी आता कपिल देवही मैदानात; अधिकाऱ्यांना केलं 'हे' आवाहन!

Operation Sindoor मधील शूरवीरांचा सन्मान! १६ BSF सैनिकांना शौर्य पुरस्कार, पाहा संपूर्ण यादी अन् 'या' योद्ध्यांचा शौर्यसंग्राम

Virat Kohli - Rohit Sharma यांचं वनडेतील करियरही संपलं म्हणणाऱ्यांना सुरेश रैनाची चपराक; म्हणाला, ते महत्वाचे आहेत कारण...

Imtiaz Jaleel mutton chicken party: स्वातंत्र्यदिनी जलील यांच्या घरी होणार मटण-चिकन पार्टी; आयुक्तांसह थेट मुख्यमंत्र्यांना निमंत्रण!

Latest Marathi News Updates: सिंहगडावरील ध्वजस्तंभाची वन विभागाकडून तातडीने दुरुस्ती

SCROLL FOR NEXT