पुणे

भूगावमधील जनसेवा केंद्रात विद्यार्थ्यांना मोफत दाखले

CD

पौड, ता. १४ : दहावी-बारावीचे निकालही जाहीर झाले आहेत. त्यामुळे पुढील शिक्षणाच्या प्रवेशासाठी विद्यार्थांना विविध प्रकारच्या सरकारी दाखल्यांची आवश्यकता असते. भूगाव (ता. मुळशी) येथील माजी उपसरपंच अक्षय सातपुते यांनी आपल्या जनसेवा महा ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून सर्व दाखले मोफत देण्याची सोय केली आहे.
विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी तसेच, शासनाच्या विविध प्रकारच्या सवलतींचा लाभ मिळविण्यासाठी सरकारी दाखले काढावे लागतात. शाळेचा निकाल लागल्यानंतर प्रवेशावेळी विद्यार्थी दाखले मिळविण्यासाठी पौडला तहसील, ग्रामसेवक, तलाठी यांच्याकडे धावपळ करतात. हे दाखले मिळविण्यासाठी सरकारी दप्तरी अनेक वेळा हेलपाटे मारावे लागतात. गर्दीमुळे दाखले वेळेत मिळणे अवघड होते. परिणामी काही विद्यार्थी, पालकांना नैराश्यालाही सामोरे जावे लागते. ही विद्यार्थी, पालकांची दरवर्षीची व्यथा आहे.
त्यामुळे सातपुते त्यांच्या या केंद्राच्या माध्यमातून प्रत्येक गरजूंना मोफत सरकारी दाखले काढून देत असतात. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले मोफत देण्याची सोय त्यांनी केली आहे.

आपल्या मुलामुलींचे महाविद्यालयीन प्रवेश करत असताना पालक नेहमी उशिरा जागे होतात. प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्यावर प्रवेशासाठी लागणारी कागद‌पत्रे मिळविण्यासाठी सुरुवात करतात. परिणामी अनेकांचे प्रवेश होत नाहीत, तसेच झालेले प्रवेश रद्दही होतात. सेवा केंद्राच्या माध्यमातून काम करत असताना गेल्या दोन वर्षांमध्ये आलेला हा अनुभव आहे. त्यामुळे आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी सजग होऊन प्रवेशप्रक्रिया सुरू होण्याअगोदरच आपल्याला आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यासाठी सर्व दाखले निःशुल्क देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
- अक्षय सातपुते, जनसेवा महा-ई-सेवा केंद्र, भूगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi : भारतात एस-४०० पेक्षाही अत्याधुनिक शस्त्रप्रणाली विकसित होणार...पंतप्रधान मोदींकडून ‘सुदर्शन चक्र मिशन’ची घोषणा

Narendra Modi on Trump Tariff: लाल किल्ल्यावरून ट्रम्पच्या टॅरिफला पंतप्रधान मोदींनी दिले उत्तर... 'मोदी दीवार बनकर खडा है'

Latest Marathi News Live Updates : सरसंघचालक मोहन भागवत यांनी उत्कल विपन्न सहायता समितीच्या परिसरात फडकावला तिरंगा

PM Modi's Independence Day 2025 Look: पांढरा कुर्ता अन् भगवा फेटा, स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदींच्या खास लूकचे फोटो आले समोर

Independence Selfie Tips: स्वातंत्र्यदिनाला घरी, ऑफिसमध्ये तिरंग्यासोबत सेल्फी घेताय? या स्पेशल टिप्समुळे तुमच्या सेल्फीवर होईल likes चा वर्षाव

SCROLL FOR NEXT