पुणे

नवा पिरंगुट गण अवघ्या अडीच गावांचा

CD

पौड, ता. १६ : मुळशी तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची गण-गटाची प्रभागरचना जाहीर झाली. बदललेल्या रचनेत पिरंगुट गावचे दोन गणात विभाजन झाले. तर काही गावांच्या गणाच्या प्रभागरचनेत फेरबदल झाले आहेत. नवा पिरंगुट गण अवघ्या अडीच गावांचा बनला आहे. तथापि प्रभाग रचना जाहीर झाल्याने इच्छुकांनी दंड थोपटण्यास सुरवात केली आहे.
पूर्वीप्रमाणेच तालुक्यात जिल्हा परिषदेचे तीन आणि पंचायत समितीसाठी सहा सदस्य राहणार आहेत. तथापि बावधन, सूस, म्हाळुंगे ही तीन गावे महापालिकेत समाविष्ट झाली. त्यामुळे २०११ ची लोकसंख्या लक्षात घेऊन गणाच्या रचनेत बदल करण्यात आला. त्यामुळे दोन गणांची नावे बदलली असून काही गावांचे गणही बदलले आहेत.
नव्या प्रभागरचनेत पिरंगुट गावचे दोन गणात विभाजन करण्यात आले आहे. त्यामुळे एकट्या पिरंगुटकरांना पंचायत समितीचे दोन सदस्य निवडून देण्याची संधी मिळाली आहे. तर, पूर्वी पौड हे गाव कोळवण खोऱ्याला जोडलेले होते. यावेळी ते माले खोरे, मुळशी धरण भागाशी जोडले आहे. त्यामुळे पूर्वीचा आंबवणे गण बदलून त्याचे नामकरण पौड आणि पूर्वीच्या पौड गणाचे नामकरण आता आंबडवेट करण्यात आले आहे. बावधन गाव महापालिकेत समाविष्ट झाल्याने पूर्वीचा बावधन गण आता भूगाव नावाने ओळखला जाणार आहे. तर, नव्याने तयार झालेल्या पिरंगुट गणात कासार अंबोली, लवळे आणि अर्धे पिरंगुट अशी अडीच गावे समाविष्ट झाली आहेत. प्रभागरचनेनंतर आता सर्वांचे लक्ष आरक्षणाकडे लागले आहे. नव्या प्रभागरचनेनुसार पौड-आंबडवेट (गट क्र. ३४), माण-हिंजवडी (गट क्र. ३५) आणि पिरंगुट-भूगाव (गट क्र. ३६) असे जिल्हा परिषदेचे तीन गट तयार झाले आहेत.

पंचायत समितीच्या गणनिहाय समाविष्ट गावांची नावे
पौड गण (क्रमांक ६७) - आंबवणे (आंबवणे, माजगाव, सालतर, पेठशहापुर, देवघर विसाघर), कुंभेरी (कोळवली), पोमगाव, चांदिवली (शिरवली), शेडाणी (नांदीवली), वळणे, अकोले, कोंढावळे (कळमशेत), चिंचवड, बेलावडे, खेचरे, आंदेशे, मांदेडे, शेरे, जामगाव (दिसली), माले (दत्तवाडी), मुळशी खुर्द (टाटा तलाव) वारक, ताम्हिणी, निवे, वडगाव, वांद्रे (पिंपरी), भांबर्डे (घुटके, आडगाव, तैलबेल, एकोले), बार्पे बु., पौड (विठ्ठलवाडी).
आंबडवेट गण (क्रमांक ६८) - मारणेवाडी, आंबेगाव, भरे, आंबडवेट, दारवली, मुगावडे, चाले (सावरगाव, करमोळी), दखणे, कुळे, नांदगाव, चिखलगाव, साठेसाई, भालगुडी, काशीग (शिंदेवाडी, घेरातिवड), हाडशी, कोळवण (डोंगरगाव, होतले), वाळेण, नाणेगाव, भादस बु. (गावडेवाडी, शिळेश्वर) असदे, खुबवली, रावडे (हुलावळेवाडी), संभवे.
माण गण (क्र. ६९) - माण, नांदे, चांदे, मुलखेड, घोटावडे (भेगडेवाडी आंमलेवाडी, मातेरेवाडी, गोडांबेवाडी नं.१, गोडांबेवाडी नं.२), रिहे (पडळघरवाडी), पिंपळोली, जवळ (केमसेवाडी), खांबोली, कातरखडक (आंधळे).
हिंजवडी गण (क्र. ७०) - हिंजवडी, मारुंजी, जांबे, नेरे (दत्तवाडी), कासारसाई.
पिरंगुट गण (क्र. ७१) - पिरंगुट (पिरंगुट वॉर्ड क्र. २ ते ६), कासार अंबोली, लवळे.
भूगाव गण (क्रमांक ७२) - भूगाव, भुकूम, पिरंगुट (पिरंगुट वॉर्ड क्र. १ - मुकाईवाडी), उरवडे, बोतरवाडी, मुठा (मोरेवाडी, भरेकरवाडी), आंदगाव, खारावडे, कोळावडे, लव्हार्डे, वातुंडे, वैगरे, टेमघर, भोडे (वेडे), वांजळे, माळेगाव, जातेडे, कोंढूर, डावजे (कातवडी), मोसे खु. (धडवली, साईव खु.), तव, धामण ओहोळ, मुगाव (कोळोशी, गडले, उगवली, भोईणी (साखरी), दासवे (वडवली, पडळघर), आडमाळ, पाथरशेत (पळसे, बेंबटमाळ, चिखली बु.).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Live Updates: धारूर तालुक्याच्या वतीने भोगलवाडी येथे महा एल्गार सभा

Karul Ghat Road Close : करूळ घाट प्रवासासाठी अतिशय धोकादायक, तज्ज्ञांकडून सर्वेक्षण; दरड हटविण्याचे काम थांबविले

Pitru Paksha 2025: आजपासून पितृपक्ष सुरू, नवपंचम राजयोगाचे दुर्मिळ संयोजन, 'या' 3 राशींसाठी सुरू होईल गोल्डन टाइम

Vijay Mallya : विजय माल्ल्या, नीरव मोदीचे लवकरच प्रत्यार्पण ? ब्रिटीश टीमने केला तिहार जेलचा दौरा

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागच्या राजाचं विसर्जन अंतिम टप्प्यात; चिंतामणीला दिला निरोप

SCROLL FOR NEXT