पुणे

डुबेवाडीकरांनी रोखले रस्त्याचे निकृष्ट काम

CD

राहू, ता. १४ : डुबेवाडी-दहिटणे रस्त्याचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे सुरू आहे. सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या दुतर्फा मुरूमाच्या साइड पट्ट्या न भरल्यामुळे डुबेवाडी येथील ग्रामस्थांनी काम बंद पाडले.
सिमेंटच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुतर्फा उत्कृष्ट दर्जाचा मुरूम जोपर्यंत भरत नाही तो पर्यंत काम सुरू करू देणार नाही. असा इशारा खरेदी-विक्री संघाचे संचालक आसरू डुबे माजी सरपंच संपतराव डुबे, देविदास डुबे, बाळासाहेब डुबे, माणिकराव डुबे मल्हारी डुबे, चंद्रकांत चांदगुडे, ग्रामपंचायत सदस्य दिनेश डुबे, गणेश डुबे आदी ग्रामस्थांनी दिला.
सिमेंट काँक्रिटचा रस्ता अरुंद असल्यामुळे दोन्ही समोरून येणारी चार चाकी गाडी क्रॉसिंग नीट होणार नाही. तसेच रस्त्यावरून जड वाहतूक सुरू झाल्यास मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. तसेच रस्त्याची उंची असल्यामुळे शेजारील रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या ग्रामस्थांना रस्त्यावर चढण्यासाठी मुरमाचे रॅम्प तयार करावे. जोपर्यंत डुबेवाडी-दहिटणे रस्त्याच्या कामासाठी उत्कृष्ट दर्जा वापरला जात नाही, तोपर्यंत आम्ही काम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा येथील ग्रामस्थांतर्फे पिलाणवाडीचे माजी सरपंच संपतराव डुबे यांनी दिला आहे.

दरम्यान, जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अभियंता मालिका इंगळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

रस्त्याच्या कामासाठी उत्कृष्ट दर्जा ठेवला जाईल. कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. त्या संदर्भात संबंधित ठेकेदाराला कळविण्यात आले आहे .
- वैशाली डुबे, पिलाणवाडी, सरपंच


शासन रस्त्याच्या कामासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी दिला जातो. परंतु संबंधित विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांची आर्थिक लागेबांधे असल्यामुळे कामाचा दर्जा राखला जात नाही.
- आसरु डुबे, खरेदी विक्री संघाचे संचालक
........................................................................
01828

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: मागील १० वर्षांमध्ये मोठ्या बाता मारण्यात आल्या. परंतु, तुमच्या आयुष्यात काहीच बदल झाला नाही - प्रियांका गांधी

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT