राहू, ता. ३ : सायंकाळच्या सुमारास जोरदार पावसाच्या सरी कोसळत दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात बुधवार (ता.२) भाद्रपदी बैलपोळा पारंपरिक पद्धतीने साजरा केला.
राहू परिसरातील पिलाणवाडी, डुबेवाडी, टेळेवाडी, दहिटणे, मिरवडी, मेमाणवाडी, सांगवी सांडस, पाटेठाण, टाकळी भीमा, वडगाव बांडे, पानवली, कोरेगाव भिवर, वाळकी, पिंपळगाव, खामगाव, नांदूर, मिरवडी, सहजपूर, बोरीभडक, बोरीऐंदी, देलवडी, लडकतवाडी, उंडवडी, तांबेवाडी, खुटबाव आदी गावांमध्ये पारंपरिक वाद्यांच्या गजर, डिजे संगीत गुलाल व भंडाऱ्याची उधळण करत बैलपोळा सण साजरा केला. बैलजोडीला घरीच पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात आला.
यांत्रीकीकरणाच्या जमान्यात बैलाची संख्या दिवसेंदिवस कमी झाली आहे. तरी पण गावातील काही शेतकरी हौसेपोटी बैलजोडी पाळतात. शेतात मशागतीसाठी आधुनिक यंत्राचा उपयोग केला जातो. परिसरातील अगदी बोटांवर मोजण्याइतक्याच शेतकऱ्यांकडे बैलांची संख्या शिल्लक आहे.
दरम्यान, डुबेवाडी येथील पांडुरंग ताथवडे यांची बैलगाडी आकर्षक ठरली.
02585
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.