राहू, ता. ४ : दौंडच्या पश्चिम पट्ट्यासह राहू, खामगाव, पिंपळगाव परिसरात गुरुवारी (ता. ४) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे वातावरणामध्ये काहीसा गारवा निर्माण झाला आहे. परिसरात पहिलाच पाऊस असल्यामुळे बाल चिमुकले आणि शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. वाऱ्यामुळे उसासह काही पिके सपाट झाली होती. सायंकाळी सातनंतर देखील पावसाच्या हलक्या सरी सुरू होत्या. महावितरणच्या वाढत्या अतिरिक्त भार नियमामुळे परिसरातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. हलक्या पावसाच्या सरींमुळे उसाच्या पानावरील जाळ्या आणि धूळ निघून गेली आहे. मुसळधार पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.