राहू, ता.३ : ‘‘कमी खर्च, लागवडीसाठी नवीन बेणे, लागवडीची पद्धत, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, पिकांचे संरक्षण या पंचसूत्रीचा व्यवस्थित अवलंब केल्यास शेतकरी १०० शंभर टनांहून अधिक उत्पादनाचे उद्दिष्ट गाठू शकतात,’’ असे ऊस कृषिरत्न डॉ. संजीव माने यांनी सांगितले.
पाटेठाण (ता . दौंड) येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना येथे वार्षिक स्नेहमेळाव्यानिमित्त ‘परवडणारी उसाची शेती’, ‘थोडेसे बदला आणि एकरी उत्पादन वाढवा’ हा प्रेरणादायी उपक्रम शेतकऱ्यांसाठी राबवण्यात आला होता. यावेळी माने बोलत होते. ते म्हणाले, शेतकऱ्यांनी रुंद सरी पद्धतीचा अवलंब करावा. त्यामुळे एकरी सऱ्यांची संख्या कमी होऊन बेणे, खते, पाणी, आंतरमशागत, मजूर आदींची बचत होते. रुंद सरी पद्धतीमुळे ऊस उगवण चांगली होते. फुटव्यांची संख्या एकरी चाळीस हजारांपर्यंत मर्यादित राहून ऊस उत्पादनामध्ये वाढ होते. आधुनिक लागवड पद्धतीमुळे ऊस रोपे तयार केल्यास एकरी दोन टन बेणे ऐवजी अर्धा टन (पाचशे किलो)ऊस रोपे तयार होतात.
एकरी शंभर टनांहून अधिक उत्पादन घेणाऱ्यांची नावे : रोहिदास वाघचौरे (एकरी १२० टन), शीतल राऊत, अक्षय जांभूळकर, रामदास गायकवाड, बाळासाहेब ठोंबरे, किसन शिंदे, भाऊसाहेब काळे, किरण करपे, श्याम थोरात, गणेश गायकवाड, आत्माराम मेमाणे, सचिन शिंदे, सतीश तावरे, ज्ञानेश्वर गरदरे, शरद शिंदे, ज्ञानेश्वर ठोंबरे, शरद शितोळे, रोहिदास जगताप, लीलाबाई शिंदे, दिलीप ठाकर, दत्तात्रेय टेळे, शिवाजी चव्हाण, वल्लीभाई सय्यद, महेंद्र थोरात, अजित शिंदे, योगेश वडघुले, साहेबराव ठोंबरे, जयसिंग शिंदे, पोपट कुलाळ, सविता शिंदे, शंकर तळेकर, राजकुमार थोरात, वसंत शितोळे, राजेंद्र कुलाळ, ज्ञानेश्वर चोंधे, सुनील शिंदे, तुकाराम चोरमले, खंडू कोकरे, शशिकांत लडकत, काशिनाथ टेळे, बळवंत शिंदे, दशरथ गिरी, विनयकुमार भानोसे, हनुमंत कोकरे, हरिश्चंद्र टेळे, पोपट गरदरे, जयसिंग होले, संतोष भरणे, मंगलदास ताम्हाणे, रोहिणी भुजबळ, आशा भुजबळ, अशोक परभाणे, अप्पासाहेब टेळे, जयश्री हंबीर, भाऊसाहेब फडतरे, भरत काळे.
स्वप्नील थोरात यांनी खोडवा उसाचे सर्वाधिक एकरी ८५.४९० टन उत्पादन घेतले. यामुळे त्यांना ‘ऊस श्री’ हा पुरस्कार देण्यात आला. तसेच ६५ टनाहून अधिक उत्पादन घेणाऱ्या तानाजी हंबीर, ऋषीकेश शेलार यांनाही शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सपत्नीक गौरवण्यात आले.
याप्रसंग अजित चौगुले, संभाजी गवारे, कारखान्याचे संचालक माधव राऊत, महेश करपे, अनिल भुजबळ, किसन शिंदे, ज्ञानदेव कदम, भगवानराव मेमाणे, हनुमंत शिवले, रवींद्र भुजबळ, चंद्रकांत ढमढेरे, लक्ष्मण कदम, डी. एम. रासकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास रासकर यांनी केले. गणेश टेमगिरे व एस. बी. टिळेकर यांनी सूत्रसंचालन केले. किसन शिंदे यांनी आभार मानले.
03011
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.