पुणे, ता. १९ : जमिनीच्या वादातून द्वेषापोटी झेंडू आणि वांग्याची झाडांवर तणनाशक फवारल्याने राहू- बागवस्ती (ता. दौंड) येथील विलास विष्णू शिंदे यांची वांगी आणि झेंडूची रोपे जळून खाक झाली आहेत. त्यामुळे साधारणतः पाच ते सहा लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
यासंदर्भात विलास शिंदे यांनी यवत पोलिस ठाण्यात २४ ऑगस्ट रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, येथील गट नंबर ९४० मध्ये आमच्या कुटुंबाने ९ एप्रिल रोजी ८१० वांग्याची रोपे आणि त्यात आंतरपीक म्हणून ७५० झेंडूच्या रोपांची लागवड केली होती. दोन्ही पिकांच्या तोडणी नुकत्याच सुरू झाल्या होत्या. मात्र, तोंडाला आलेला घास हिरावून घेतला. आमचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. महेश शिंदे (रा. राहू, ता . दौंड) यांच्यासह इतर अनोळखी चार ते पाच मजुरांनी जाणून- बुजून त्यांच्या शेतात टू फोर डी तणनाशकाची फवारणी करत असताना वाऱ्याच्या वेगामुळे वांगी आणि झेंडू पिकाचे नुकसान झाले, असे तक्रारदार विलास शिंदे यांनी आरोप केला आहे.
नुकसानग्रस्त पिकाची यवत पोलिस, दौंड तालुका कृषी अधिकारी, बारामती कृषी विभागीय कार्यालयाकडे तक्रार दिली आहे. कृषी अधिकारी व त्यांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला आहे. बारामती येथील प्रयोगशाळेत वरील पिकांचे नमुने तपासले असता टुफोरडी तणनाशकाचा घटक आढळल्याचे निष्पन्न झाले. नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे. या घटनेचा, कृषी विभाग, पोलिस उपनिरीक्षक गोविंद भोसले अधिक तपास करत आहे.
माझा पिकांवर झालेला खर्चही वसूल झाला नाही. त्यामुळे माझे कुटुंब उघड्यावर आले आहे. शेती पिकांसाठी मी कर्ज घेतले होते. कर्जाचे हप्तेही रखडले आहे. यापूर्वीही संबंधितांनी आमच्या पिकांचे नुकसान केले होते. मी आणि माझे कुटुंब उपजीविकेसाठी इतर ठिकाणी कामाला जात आहे. संबंधितांकडून आमच्या कुटुंबीयांच्या जीविताला धोका आहे. आमची नुकसान भरपाई मिळावी.
-विलास शिंदे/योगेश शिंदे, नुकसानग्रस्त शेतकरी, राहू
03299
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.