पुणे

डुबेवाडी शाळेत अखेर शिक्षक रुजू

CD

राहू, ता. १२ : डुबेवाडी (ता. दौंड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नोव्हेंबर २०२५पासून संबंधित शिक्षिका शाळेत रुजू न झाल्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. मात्र, आता दोन दिवसांपूर्वी या शाळेत उपशिक्षक साहेबराव लोणारी यांची तोंडी आदेश देऊन तात्पुरती निवड केली आहे.
दरम्यान, ‘चार महिन्यांपासून शाळेत शिक्षिका रुजूच नाही’, या मथळ्याखाली २४ फेब्रुवारी रोजी ‘सकाळ’मध्ये बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर शिक्षण विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. येथील ग्रामस्थांनी शाळेत कायमस्वरूपी शिक्षक नेमावा, अशी मागणी केली आहे.
याबाबत श्रीकृष्ण डुबे यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, दौंड तहसील कार्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग, ग्रामपंचायत पिलाणवाडी यांच्याकडे ग्रामस्थांच्या चाळीसहून अधिक स्वाक्षरींसह लेखी तक्रार अर्ज केला होता.

दौंड तालुका जिल्ह्यातील सर्वात कमी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल लागलेला तालुका आहे. राजकीय शिक्षक मोबाइलवर व्यस्त असतात. राजकीय शिक्षकांमुळे पिढी बरबाद होत चालली आहे. शिक्षक शाळेवर कमी आणि इतर व्यासपीठावर जास्त उपस्थित असतात. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्याच्या शिक्षण विभागाने दौंड तालुक्यात विशेष लक्ष घालावे. दौंडच्या शैक्षणिक परिस्थिती संदर्भात राज्याचे शिक्षणमंत्री यांना मी प्रत्यक्ष निवेदन देऊन भेटणार आहे.
- शांताराम बांदल, सामाजिक कार्यकर्ते

संबंधित शिक्षिका सुनीता काटम १ एप्रिलपासून शाळेत रुजू होणार आहेत. त्यामुळे उपशिक्षक साहेबराव लोणारी यांची तात्पुरती निवड केली आहे.
- अजित पवार, केंद्रप्रमुख, प्राथमिक केंद्र शाळा, राहू

माझी राहू नजीक दत्तनगर येथे नियुक्ती आहे. राहू येथील केंद्रप्रमुख आणि डुबेवाडी शाळेतील मुख्याध्यापकांनी मला तोंडी बोलून तात्पुरते रुजू होण्यास सांगितले आहे.
- साहेबराव लोणारी, उपशिक्षक

03744

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati Wedding Card : टीपू सुलतान प्रेरणास्थान, शिवरायांचाही उल्लेख; अमरावतीतील लग्नपत्रिका व्हायरल...

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! ३० तास पाणीपुरवठा ठप्प, 'या' सहा विभागातील जलवाहिनी बंद होणार; कधी? वाचा सविस्तर

Navi Mumbai Drug Racket : शांताबाई करंडेकर टोळीचा गेम ओव्हर! दिघ्यात लेडी डॉनचं साम्राज्य उद्ध्वस्त करत पोलिसांनी अवैध मालमत्तेवर फिरवला बुलडोझर

OCI Card New Rule: नागरिकत्व नियमांत मोठा बदल! अल्पवयीन मुलांच्या पासपोर्टवर मोठी बंदी; OCI साठी नवे डिजिटल नियम लागू

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे यांची भूमिका दिवसेंदिवस बदलत जाते- प्रताप सरनाईक

SCROLL FOR NEXT