राजगुरूनगर, ता. १५ : राजगुरुनगर सहकारी बँक भोसरी, मंचर, आळेफाटा, जुन्नर, पाबळ, पाईट, कडूस या शाखांसाठी स्वमालकीच्या वास्तू उभारणार आहे. दुर्दैवाने कर्जदाराचा मृत्यू झाल्यास जमीनदारांना व वारसांना तोशीस लागू नये, म्हणून बँक कर्जदारांना, कर्ज रकमेइतका विमा उतरविण्याची ऐच्छिक सुविधा उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती राजगुरूनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल यांनी दिली.
राजगुरूनगर सहकारी बँकेची ९३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष ओसवाल यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (ता. १५) खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी मागील सभेचे अहवाल वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम वाकचौरे यांनी केले. पुढे विषयपत्रिकेनुसार एकेका विषयावर चर्चा झाली. त्यात प्रामुख्याने वसुली, एनपीए, लाभांश या विषयांवर चर्चा झाली. ज्येष्ठ सभासद अनिलबाबा राक्षे, खंडेराव थिगळे, शरद मुऱ्हे, ॲड. महादेव घुले, मारुती सातकर, अशोक दुगड, रेवणनाथ थिगळे, अण्णा वरकड, बाळशिराम बोंबले पाटील, धनंजय भागवत, सतीश नाईकरे पाटील, प्रकाश पाचारणे आदी सभासदांनी या विषयांवरील चर्चेत सहभाग घेतला.
बँकेच्या १५५१ कोटी रुपयांच्या ठेवी व ९४३ कोटी रुपयांची कर्जे मिळून साधारण अडीच हजार कोटींचा व्यवसाय आहे. बँकेचा ढोबळ नफा ४५ कोटी ६२ लाख असून निव्वळ नफा १५ कोटींचा आहे, अशी माहिती ओसवाल यांनी दिली.
उपाध्यक्ष अविनाश कहाणे, संचालक किरण आहेर, राजेंद्र सांडभोर, गणेश थिगळे, विजया शिंदे, राजेंद्र वाळुंज, राहुल तांबे, अरुण थिगळे, सागर पाटोळे, दत्ता भेगडे,विजय डोळस, विनायक घुमटकर, समीर आहेर, सचिन मांजरे, अश्विनी पाचारणे, रामदास धनवटे, तज्ञ संचालक ॲड. धर्मेंद्र खांडरे, गौतम कोतवाल, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य ॲड. सुरेश कौदरे, महेश शेवकरी, विकास बाणखेले व्यासपीठावर उपस्थित होते.उपाध्यक्ष कहाणे यांनी आभार मानले.
बँकेला सरत्या आर्थिक वर्षासाठी लेखापरीक्षणात ‘अ’ वर्ग मिळाला आहे. बँकेने सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाचे प्रतिनिधित्व मिळविले असून कर्जदारांनी शासकीय सबसिडीच्या योजनांचा लाभ घेऊन आपला व्यवसाय उत्तमपणे उभारावा. शेती व शेतीपूरक व्यवसाय, शिक्षण, घरदुरुस्ती, सौर ऊर्जा इत्यादी संदर्भात नवीन कर्जयोजना सुरू केल्या आहेत, त्यांचाही लाभ घ्यावा.
- दिनेश ओसवाल, अध्यक्ष, राजगुरूनगर सहकारी बँक
03214
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.