राजगुरुनगर, ता. २८ : चालकाचे नियंत्रण सुटल्याने बैल घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा अपघात होऊन एकाचा मृत्यू झाल्याची आणि ४ जण जखमी झाल्याची घटना खेड तालुक्यातील धामणगाव येथे पाईट- भीमाशंकर रस्त्यावर शुक्रवारी (ता. २८) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. कोंडू सतू बांगर (वय ५५, रा. बांगरवाडी- कुडे बुद्रुक, ता. खेड) असे मृताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी माहिती दिली की, ढाकाळे (ता. आंबेगाव) या गावी बैलगाडा शर्यतीसाठी घोटवडी येथील पांडुरंग पारधी हे टेम्पोमधून (क्र. एम.एच. १४ ई.एम. ४१७६) बैल व गाडा घेऊन जात होते. त्यांचा भाचा कोंडू बांगर व इतर काही जण या टेम्पोत बसले होते. वसंत मेमाणे हा टेम्पो चालवत होता. घोटवडी आणि धामणगावच्या मध्ये असलेल्या घाटात चालकाचे नियंत्रण सुटून टेम्पो उलटला. त्यामुळे टेम्पोत बसलेले सर्वजण खाली पडले. त्यांपैकी कोंडू बांगर यांचा मृत्यू झाला, तर इतर ४ जण जखमी झाले. अपघातानंतर जखमींना कुडे रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.