पुणे

भीमाशंकर- राजगुरुनगर रस्ता होणार कॉंक्रिटचा

CD

राजगुरुनगर, या. १० : भीमाशंकर- तळेघर- वाडा ते राजगुरुनगर या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग म्हणून मान्यता दिल्यानंतर दुपदरी कॉंक्रिटीकरणाचे काम मंजूर झाले आहे. त्याचे राजपत्र २६ मार्च रोजी शासनाकडून प्रसिद्ध झाल्याची माहिती भीमाशंकर देवस्थान संस्थानचे अध्यक्ष ॲड. सुरेश कौदरे यांनी दिली.
भीमाशंकर- वाडा- राजगुरूनगर आणि जुन्नर- घोडेगाव- तळेघर या रस्त्याचे पादचारी मार्गासह चौपदरीकरण आणि मजबुतीकरण होणार असून, त्यासाठी केंद्र सरकारने २३४९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. भीमाशंकर ते राजगुरुनगर या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० देण्यात आला आहे. खेड तालुक्यातील २५ गावांमधून हा महामार्ग जाणार आहे. राजगुरुनगर ते भीमाशंकर ६० किलोमीटर लांबीचा हा रस्ता असून, त्यासाठी ८७ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. तर, आंबेगाव तालुक्यातील एका गावातील २ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. खेड तालुक्यातील कारकुडी, टोकावडे, शिरगाव, धुवोली, वांजाळे, डेहणे, खरोशी, आव्हाट, वाळद, तिफनवाडी, वाडा, दरकवाडी, बुरसेवाडी, गुंडाळवाडी, कडधे, कान्हेवाडी बुद्रुक, मोहकल, कमान, चास, आखरवाडी, पांगरी, पाडळी, सातकरस्थळ, वडगाव, चांडोली या गावांमधून हा नवीन रस्ता जाणार आहे.
या गावांची नावे आणि संपादित होणाऱ्या जमिनींची माहिती राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. लवकरच संपादन होणाऱ्या गटांची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. नाशिकला सन २०२७मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यापूर्वी हा रस्ता व्हावा, असा केंद्र सरकारचा प्रयत्न असणार आहे, असे ॲड. कौदरे म्हणाले.

श्री क्षेत्र भीमाशंकरकडे राजगुरुनगर- चासकमान- वाडा या मार्गाने येण्यासाठीचा रस्ता अरुंद होता. तसेच, तो नेहमी खराब होत होता. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाची आमची मागणी होती. हा रस्ता होताना रूंदीकरणासह त्याची दर्जावाढ होणार आहे. अनेक वळणे काढून टाकली जाणार आहेत, तर काही गावांच्या बाहेरून तो नेला जाणार आहे. आता भाविकांची गैरसोय कायमस्वरूपी दूर होईल.
- ॲड. सुरेश कौदरे, अध्यक्ष,
भीमाशंकर देवस्थान संस्थान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Qualifier 1: विराट कोहलीने GT विरुद्धच्या सामन्यापूर्वी RCB ची चिंता वाढवली... समोर आले धक्कादायक अपडेट्स

चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित 'गव्हर्नर' सिनेमाचा ट्रेलर रिलीज ! मनोज वाजपेयींची मुख्य भूमिका

Alandi Temple Security : आळंदीतील दानपेटी चोरी प्रकरणानंतर देवस्थान प्रशासन सतर्क: व्यवस्थापकांसह कर्मचाऱ्यांकडून खुलासा

Eid Al-Adha 2026: भारतात बकरी ईद 27 मे की 28 मे रोजी साजरी होणार? जाणून घ्या नेमकी तारीख आणि भारतात कुठे, कशी साजरी होते ईद

Teacher Recruitment 2025: शिक्षक भरती २०२५ : पवित्र पोर्टलवरील रिक्त पदे नोंदविण्यासाठी किमान ३० दिवस मुदतवाढ देण्याची उमेदवारांची मागणी

SCROLL FOR NEXT