Pune Traffic Jam Representational Image

 
पुणे

अखेर तळेगाव-चाकण रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न सुरु

प्रदीर्घ काळापासून रखडलेले तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याची दुरुस्ती व रुंदीकरणाचे काम सुरु होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

राजगुरुनगर : तळेगाव- चाकण- शिक्रापूर रस्ता दुरुस्ती व रुंदीकरणाच्या कामासाठी ५९ कोटी रुपयांच्या निधीस राज्य सरकार व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मान्यता दिली आहे, अशी माहिती आमदार बाबाजी काळे यांनी दिली.‌

तळेगाव- चाकण- शिक्रापूर रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यात यावी व उपाययोजना करण्यात याव्यात, यासाठी आमदार बाबाजी काळे यांनी अधिवेशनात आवाज उठवला होता.‌ तसेच, आमदार सचिन अहीर, आमदार सुनील शेळके, आमदार माउली कटके यांना सोबत घेत विधानभवनाच्या पायऱ्यावर लक्षवेधी आंदोलन केले होते. या आंदोलनास यश आले असून, कामासाठी मोठा निधी मिळाला आहे.

या कामामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल, अपघातांचा धोका टळेल आणि औद्योगिक वाहतुकीला मोठा दिलासा मिळेल, असे आमदार काळे यांनी सांगितले. त्यांनी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, पालकमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग व चाकण कृती समितीचे आभार व्यक्त केले.

तळेगाव- चाकण- शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ डी या ५४ किलोमीटर मार्गाच्या दुरुस्ती व रुंदीकरणासाठी एकूण ५९.७५ कोटी निधीस मान्यता सरकारने दिली. चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आमदार काळे यांचा सरकार दरबारी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. त्यांनी नागपूर व मुंबई येथील अधिवेशनात आवाज उठवत सरकारचे या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेतले होते.

पीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी व उपाय योजनेसंदर्भात २३ जुलै रोजी आढावा बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्येही पीएमआरडीएमध्ये याच प्रश्नी बैठक घेण्यात आली. तसेच, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई मंत्रालयात येथे सर्व संबंधित विभागांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर आता राज्य सरकारने या रस्त्याच्या दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ५९ कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT