राजगुरुनगर, ता. २८ : राजगुरुनगर मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. पौर्णिमा कहाणे, तर उपाध्यक्षपदी डॉ. सीमा घुमटकर यांची निवड झाली.
असोसिएशनच्या नुकत्याच झालेल्या मासिक सभेत नवीन कार्यकारिणीची निवड प्रक्रिया पार पडली.
असोसिएशनच्या सचिवपदी डॉ. सौदामिनी वाडेकर, तर सहसचिवपदी डॉ. कुणाल खर्डे व डॉ. राम बोराडे यांची निवड झाली. यावेळी ज्येष्ठ डॉ. प्रदीप शेवाळे, डॉ. सुभाष खडके, डॉ. दिलीप बांबळे, डॉ. मुरलीधर भुजबळ, डॉ. विलास काजळे यांच्यासह राजगुरुनगर शहरातील डॉक्टर उपस्थित होते.