Vaibhav Sooryavanshi ला टीम इंडियात संधी मिळाली, LSG च्या संजीव गोएंका यांची पोस्ट व्हायरल! म्हणतात, देश आश्चर्याने पाहत आहे...

Vaibhav Sooryavanshi India A squad news: श्रीलंकेत होणाऱ्या आगामी त्रिरंगी मालिकेसाठी इंडिया ‘अ’ संघाची घोषणा होताच युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी आणि आयुष बडोनी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला आहे. विशेष म्हणजे लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोएंका यांनी केलेली सोशल मीडिया पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Sanjiv Goenka reaction on Vaibhav Sooryavanshi selection

Sanjiv Goenka reaction on Vaibhav Sooryavanshi selection

esakal

Updated on

Sanjiv Goenka reaction on Vaibhav Sooryavanshi selection: भारताचा अ संघ इंडियन प्रीमिअर लीग २०२६ नंतर श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे आणि तिथे तिरंगी मालिकेत सहभाग घेणार आहे. या मालिकेसाठी BCCI ने गुरुवारी १५ सदस्यीय संघ जाहीर केला. तिलक वर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघात वैभव सूर्यवंशीचे नाव पाहून सर्वांना आनंद झाला. १५ वर्षीय खेळाडूने आयपीएलमध्ये आपला दबदबा दाखवून दिला आहे आणि भारताच्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेतही त्याने विश्वविक्रमी कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याची भारतीय संघात निवड व्हावी, अशी अनेकांनी इच्छा व्यक्त केली होती. भारताच्या सीनियर संघात नाही, परंतु अ संघात त्याची अखेर निवड झाली. या घोषणेनंतर लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोएंका यांनी वैभव आणि आयुष बडोनी यांचे विशेष कौतुक केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com