राजगुरुनगर, ता. ४ : दुकानात एकट्या असलेल्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी ८च्या सुमारास येथील पाबळ रस्त्यावरील चव्हाणमळा परिसरात घडली.
याप्रकरणी सुवर्णा सिद्धेश्वर पोतेकर (रा. शिवपुष्प इमारत, चव्हाणमळा, ता. खेड, जि. पुणे) यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांचे पाबळ रस्त्यावर इलेक्ट्रिकल वस्तूंचे दुकान आहे. शुक्रवारी (३० एप्रिल) संध्याकाळी ८च्या सुमारास त्या एकट्याच दुकानात होत्या. त्यावेळी दोन तरुण मोटारसायकलवरून दुकानासमोर आले. त्यापैकी मागे बसलेला तरुण दुकानात येऊन काउंटरजवळ उभा राहिला आणि ‘हॅक्सॉ ब्लेड’ मागू लागला. पोतेकर यांनी त्यांच्याकडे लहान ‘हॅक्सॉ ब्लेड’ असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने लगेच नट-बोल्टची मागणी केली. नट-बोल्ट देण्यासाठी पोतेकर खाली वाकल्या असता, आरोपीने क्षणार्धात त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. त्यानंतर तो तात्काळ दुकानाबाहेर उभ्या असलेल्या मोटारसायकलवर बसला आणि दोघेही संशयित राजगुरुनगरच्या दिशेने पळून गेले. हिसकावलेले मंगळसूत्र अंदाजे तीन तोळ्यांचे होते.
खेड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरवस्तीत झालेल्या चोरीच्या या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.