राजेगाव, ता. ७ : गेल्या वर्षी मिळालेल्या चांगल्या बाजारभावामुळे यंदाही दोन पैसे पदरात पडतील या आशेने राजेगाव, आलेगाव परिसरात कांदा लागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. सध्या कांदा लागवडीची मोठ्या प्रमाणात लगबग सुरू आहे
यंदा कांदा रोप उगवण क्षमता कमी झाली. वातावरणात होणाऱ्या बदलामुळे रोपांवर येणारे रोगांवर औषधांचा खर्च वाढला. रोपांच्या किंमतीत यंदा भरमसाठ वाढ झाली. लागवड करणाऱ्या टोळ्यांनीही भाव वाढवले आहेत. ते एकरी १२ ते १४ हजारांपर्यंत गेले. अशा अनेक कारणांमुळे निश्चितच शेतकऱ्यांच्या खिशाला मात्र कात्रीही लागली आहे.
सर्वसाधारणपणे कांदा हे पीक मुख्यत्वे खरीप व रब्बी या दोन हंगामात लागवड होत असते. खरिपातील कांदा लागवड ही जून- जुलै तर रब्बीतील कांदा ऑक्टोंबर-नोव्हेंबर मध्ये रोप टाकून डिसेंबर-जानेवारीमध्ये होत असते. कांदा लागवड करत असताना चांगल्या प्रतीची बियाणे, सुधारित लागवड पद्धत, तन नियंत्रण, एकात्मिक कीड रोग नियंत्रण, खत नियोजन या पद्धतीचा वापर केल्यास शेतकऱ्याच्या उत्पन्नात निश्चित वाढ होते.
कांदा लागवड किंवा इतर कोणत्याही पिकाची लागवड करताना त्याच्या उत्पादन खर्चावर मर्यादा आणण्याची गरज आहे. यामध्ये मुख्यत्वे घरगुती बियाणे तयार करणे, त्याची उगवण क्षमता तपासणे, एकात्मिक कीड रोग नियंत्रण करणे, योग्य आणि संतुलित खताचा वापर करणे अशा बाबी अवलंबल्यास उत्पादन खर्च कमी होऊ शकतो.
- शिवाजी कदम, कृषी सहाय्यक खानवटे (ता. दौंड)
आम्ही दरवर्षी बाराशे ते पंधराशे गोणी कांदा पिकाचे उत्पादन घेत असतो. आम्हाला २२ रुपयांपासून ७० रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे. विक्री करताना जुलैपासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत टप्प्याटप्प्याने विक्री केली. त्यामुळे आम्हाला चांगला झाला आहे.
- गणेश ठोंबरे, कांदा उत्पादक शेतकरी, शिरापूर (ता.दौंड)
00714
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.