राजेगाव, ता. १ ः स्वामी-चिंचोली (ता. दौंड) गावच्या हद्दीत पोलिस मदत केंद्राची नितांत गरज असून, या मागणीसाठी ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे लेखी निवेदन दिले आहे. पूर्वी येथे पोलिस मदत केंद्र होते, परंतु महामार्ग रुंदीकरण कामात ते पाडण्यात आले होते.
सोमवारी (ता. ३०) पहाटे देवदर्शनाला निघालेल्या एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे. पुणे-सोलापूर महामार्गालगत असलेले हे गाव दिवसेंदिवस वेगाने विकसित होत असून, शैक्षणिक व व्यावसायिक दृष्टिकोनातून येथे मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढलेली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी पोलिस मदत केंद्र अत्यंत गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
स्वामी-चिंचोली गावाच्या परिसरात शाळा, महाविद्यालये, विविध व्यावसायिक आस्थापना असून, या भागात विद्यार्थ्यांची व नागरिकांची सततची हालचाल असते. विशेषतः शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि कुठल्याही आपत्कालीन प्रसंगी त्वरित पोलिस मदत मिळण्यासाठी येथे एक स्वतंत्र पोलिस मदत केंद्र असावे, अशी भूमिका सरपंच पूनम मदने यांनी मांडली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.