पुणे

झगडेवाडीच्या चिमुकल्यांकडून १० हजारांची मदत

CD

राजेगाव, ता. १३ ः कुरकुंभ (ता. दौंड) परिसरातील झगडेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा हा अनोखा उपक्रम राबवून १० हजार रुपयांची मदत जमा केली.
पूरग्रस्त भागांमधील अनेक शाळांमध्ये, तसेच कित्येक शाळकरी मुलांच्या घरांमध्ये पाणी शिरले. मुलांचे दप्तर, वह्या, पुस्तके पाण्याने भिजवून खराब झाले. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पूरग्रस्त लोकांना अनेकजण मदत करतात मग आपणही केली पाहिजे, या भावनेतून या उपक्रमाला सुरुवात झाली.
या उपक्रमांतर्गत एक रिकामा बॉक्स घेऊन त्यावर पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा असे लिहिले. वरून पैसे टाकण्यासाठी एक छोटे छिद्र ठेवण्यात आले. हा बॉक्स घेऊन विद्यार्थी गावात घरोघरी गेले व पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात मागितला. या उपक्रमाची स्वतःपासून सुरुवात करावी म्हणून, प्रथम मुख्याध्यापक विशाल चौधरी व इतर शिक्षकांनी बॉक्समध्ये त्यांच्या इच्छेप्रमाणे रक्कम टाकली. यानंतर गावातील ग्रामस्थ, पालक, वाटसरू आदींनी स्वच्छेने त्यांच्या मनाप्रमाणे रक्कम त्या बॉक्समध्ये टाकली. थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे थोडे थोडे करत तब्बल १० हजार रुपये रक्कम त्या बॉक्समध्ये जमा झाली. जमा झालेल्या रकमेचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या नावे नायब तहसीलदार तुषार बोरकर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.

01475

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT