पुणे

खडकी येथे विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला जीवदान

CD

राजेगाव, ता. १० : खडकी (ता. दौंड) येथील प्रज्वल किसन काळे यांच्या शेतातील विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वनविभाग आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मध्यरात्री सुखरूप बाहेर काढले. बचाव मोहिमेनंतर कोल्ह्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले आहे.
खडकी परिसरात रात्रीच्या वेळी विहिरीत कोल्हा पडल्याचे निदर्शनास येताच स्थानिक युवक सचिन काळभोर यांनी तातडीने वनविभागाला कळवले. घटनेचे गांभीर्य ओळखून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बारामती येथील बचाव पथकासह रात्री एक वाजता घटनास्थळी धाव घेतली. विहिरीची खोली आणि रात्रीची वेळ अशा आव्हानात्मक परिस्थितीत सर्वांनी एकत्रित प्रयत्न करून कोल्ह्याची सुटका केली. या मोहिमेत दौंडचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे, वनपाल विकास वाघमारे, वनरक्षक अक्षय शितोळे, कर्मचारी शरद शितोळे आणि बारामती बचाव पथकाचे कांबळे यांनी सहभाग घेतला. यावेळी सचिन काळभोर, पंकेश काळभोर, यशराज काळभोर, संदीप काळभोर, राजेंद्र सकुंडे, पप्पू जगताप, सागर काळे, नितीन काळभोर, रोहित काळभोर, अनिल गुणवरे यांच्यासह ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT