पुणे

राजेगावात २५ शेतकऱ्यांच्या कृषिपंपांतील केबलची चोरी

CD

राजेगाव, ता.१० : राजेगाव (ता. दौंड) येथील भीमा नदीच्या काठावर असलेल्या पंचवीस शेतकऱ्यांच्या कृषिपंपांच्या केबलांची चोरी झाली आहे. ऐन उन्हाळ्याच्या उंबरठ्यावर पिकांना पाण्याची तीव्र गरज असताना चोरी झाल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. या चोरीमुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.
राजेगावला भीमा नदीच्या पात्रातून पाणी उपसा करणाऱ्या अनेक कृषी पंप आहेत. शेतकऱ्यांच्या विद्युत पंपांच्या महागड्या केबल तसेच काही ठिकाणचे मोटार पंप अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्रीत लंपास केल्याची घटना नुकतीच घडली आहे. एका शेतकऱ्याची १०० ते १५० फूट केबल चोरी झाली आहे. यातील तारा तांब्याच्या असून प्रत्येकाच्या किमान आठ ते १५ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही सकाळी शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी शेतात गेले असता पंप सुरू होत नसल्याने त्यांनी नदीवर जाऊन पाहणी केली. त्यावेळी केबल कापून नेल्याचे लक्षात आले. चोरीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.
सध्या मार्च महिना सुरू असून, अत्यंत गरज असताना केबल चोरीला गेल्याने पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. नवीन केबल खरेदी करून पुन्हा बसवण्यासाठी मोठा खर्च येणार असल्याने आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

केबल चोरीच्या प्रकारामुळे राजेगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांनी आता नदीपात्रातील कृषी पंप आणि साहित्यालाच लक्ष्य केल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास करून चोरट्यांचा शोध घ्यावा.
- श्रीकांत पानसरे, शेतकरी राजेगाव (ता. दौंड)

01648

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Qualifier 1: विराट कोहलीने GT विरुद्धच्या सामन्यापूर्वी RCB ची चिंता वाढवली... समोर आले धक्कादायक अपडेट्स

चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित 'गव्हर्नर' सिनेमाचा ट्रेलर रिलीज ! मनोज वाजपेयींची मुख्य भूमिका

Alandi Temple Security : आळंदीतील दानपेटी चोरी प्रकरणानंतर देवस्थान प्रशासन सतर्क: व्यवस्थापकांसह कर्मचाऱ्यांकडून खुलासा

Eid Al-Adha 2026: भारतात बकरी ईद 27 मे की 28 मे रोजी साजरी होणार? जाणून घ्या नेमकी तारीख आणि भारतात कुठे, कशी साजरी होते ईद

Teacher Recruitment 2025: शिक्षक भरती २०२५ : पवित्र पोर्टलवरील रिक्त पदे नोंदविण्यासाठी किमान ३० दिवस मुदतवाढ देण्याची उमेदवारांची मागणी

SCROLL FOR NEXT